मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : लग्नसराई नव्हे निमित्त २००० च्या नोटबंदीचं, सोने दरात ५०० रुपयांची वाढ,चांदीही वधारली

Gold Silver Price Today : लग्नसराई नव्हे निमित्त २००० च्या नोटबंदीचं, सोने दरात ५०० रुपयांची वाढ,चांदीही वधारली

May 23, 2023, 07:45 AM IST

    • Gold Silver price today 23 May 2023 : सोने दरवाढीला यंदा लग्नसराई नव्हे तर २००० रुपयांच्या नोटबंदीचं कारण पुरेसं ठरलयं. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. पाहा आजचे दर -
Gold Silver price today HT

Gold Silver price today 23 May 2023 : सोने दरवाढीला यंदा लग्नसराई नव्हे तर २००० रुपयांच्या नोटबंदीचं कारण पुरेसं ठरलयं. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. पाहा आजचे दर -

    • Gold Silver price today 23 May 2023 : सोने दरवाढीला यंदा लग्नसराई नव्हे तर २००० रुपयांच्या नोटबंदीचं कारण पुरेसं ठरलयं. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. पाहा आजचे दर -

Gold Silver price today 23 May 2023 : आज २३ मे २०२३ . इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोमवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६०८२९ रुपये प्रति तोळा होता. हा दर सकाळी ६०७६० रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात ६९ रुपयांची वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ६०२७५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे तो मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम ५५४ रुपयांच्या वाढीसह बंद झाला आहे.

चांदीचे दर

याशिवाय आज चांदीचा दर ७२५२१ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर मंगळवारी सकाळी ७२०९५ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीच्या दरात ४२६ रुपयांची वाढ झाली आहे.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७१७८४ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीचा दर किलोमागे ७३७ रुपयांनी वाढला आहे.

बाजारभावापेक्षा जास्त भावाने दागिने का मिळतात?

सोनार आमच्याकडून बाजारभावापेक्षा जास्त पैसे घेतात. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की बाजारातील किंमत शुद्ध धातूची आहे. हा दागिन्यांचा दर नाही. म्हणूनच कोणताही दुकानदार तुमच्याकडून दागिन्यांच्या वजनावर जीएसटी आणि सेवा शुल्क आकारतो.ज्यामुळे तुमचे दागिने बाजारभावापेक्षा जास्त पोहोचतात.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग