मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani : अदानींनी दोन दिवसांत जेवढे पैसे गमावले, तेवढ्या पैशांत पाकिस्तानने ८ महिने बसून खाल्ले असते!

Adani : अदानींनी दोन दिवसांत जेवढे पैसे गमावले, तेवढ्या पैशांत पाकिस्तानने ८ महिने बसून खाल्ले असते!

Jan 30, 2023, 03:13 PM IST

  • Gautam Adani Wealth: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी दोन दिवसात गमावलेल्या संपत्तीत पाकिस्तानने आठ महिने बसून खाल्ले असते, असे मत तज्ञ्जांकडून व्यक्त केले जात आहे.

Gautam Adani (REUTERS)

Gautam Adani Wealth: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी दोन दिवसात गमावलेल्या संपत्तीत पाकिस्तानने आठ महिने बसून खाल्ले असते, असे मत तज्ञ्जांकडून व्यक्त केले जात आहे.

  • Gautam Adani Wealth: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी दोन दिवसात गमावलेल्या संपत्तीत पाकिस्तानने आठ महिने बसून खाल्ले असते, असे मत तज्ञ्जांकडून व्यक्त केले जात आहे.

Gautam Adani: आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. एका अहवालानुसार, अदानी यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अदानींची सातव्या स्थानावर घसरण झाली. विशेष म्हणजे, अदानी यांनी इतकी संपत्ती गमावली आहे की, सध्या अर्थव्यवस्था ढासळल्याने गटांगळ्या खाणाऱ्या पाकिस्तानमधील लोकांनी तब्बल आठ महिने बसून खाल्लं असतं.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये ९१.२ कोटी अमेरिकी डॉलर्सची घसरण झाली. अदानींची एकूण संपत्ती ११८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षीवर ४४ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.वार्षिक सरासरीच्या आधारे अडाणींच्या एकूण संपत्तीमध्ये २.४४ अब्ज डॉलर्सची पडझड झाली. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंतांच्या यादीमध्ये गौतम अदानींच्या पुढे निघून गेले आहेत. जेफ बेजोस यांची संपत्ती ५.२३ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. जेफ बेजोस यांची संपत्ती ११८ अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. श्रीमंताच्या यादीत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १८२ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

गौतम अदानी गेल्या दोन दिवसांत यांच्या संपत्तीत २.११ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, गौतम अदानी यांनी गमावलेल्या संपत्तीत पाकिस्तान सुमारे ८ महिने घरात बसून खाऊ शकतो. आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानच्या 8 महिन्यांच्या आयातीसाठी ही रक्कम पुरेशी आहे.

विभाग