मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2023 : यंदाच्या वर्षी अर्थमंत्रालयात ‘हलवा समारंभ’ होणार का ? ही आहे परंपरा हलवा समारंभाची

Budget 2023 : यंदाच्या वर्षी अर्थमंत्रालयात ‘हलवा समारंभ’ होणार का ? ही आहे परंपरा हलवा समारंभाची

Jan 15, 2023, 06:01 PM IST

    • Budget 2023 : जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा होते तेव्हा सर्वात प्रथम लक्षात येते तो 'हलवा समारंभ' !  गेल्यावर्षीच्या ब्रेकनंतर यंदा पुन्हा हलवा समारंभ होणार का असाच प्रश्न सध्या चांगलाच ट्रेडिंग होतोय. जाणून घेऊया अशी आहे खासियत हलवा समारंभाची -  
Halwa ceremoney_HT

Budget 2023 : जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा होते तेव्हा सर्वात प्रथम लक्षात येते तो 'हलवा समारंभ' ! गेल्यावर्षीच्या ब्रेकनंतर यंदा पुन्हा हलवा समारंभ होणार का असाच प्रश्न सध्या चांगलाच ट्रेडिंग होतोय. जाणून घेऊया अशी आहे खासियत हलवा समारंभाची -

    • Budget 2023 : जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा होते तेव्हा सर्वात प्रथम लक्षात येते तो 'हलवा समारंभ' !  गेल्यावर्षीच्या ब्रेकनंतर यंदा पुन्हा हलवा समारंभ होणार का असाच प्रश्न सध्या चांगलाच ट्रेडिंग होतोय. जाणून घेऊया अशी आहे खासियत हलवा समारंभाची -  

Budget 2023 : जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा होते तेव्हा सर्वात प्रथम लक्षात येते तो 'हलवा समारंभ' ! हलवा समारंभ ही अशी परंपरा आहे, जी वर्षानुवर्षे पाळली जाते. गेल्या वर्षी कोविड प्रोटोकॉलमुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे अर्थसंकल्प २०२३ मांडण्यापूर्वी हा तोंड गोड करणारा हलवा समारंभ होणार का असाच प्रश्न सगळ्यांच्या मनात रुंजी घालतोय.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

१ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी खास असणार आहे. याचे पहिले कारण म्हणजे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे कारण पुढील २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. अशा स्थितीत आता पूर्ण अर्थसंकल्प सरकार निवडणुकीनंतरच सादर करेल. त्याचवेळी, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या विशेष अपेक्षा आहेत.

जेव्हा जेव्हा बजेटची चर्चा अंतिम टप्प्यात येते तेव्हा सर्वात प्रथम लक्षात येतो तो हलवा समारंभ. हलवा समारंभ ही बजेट मांडण्यापूर्वीची गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आहे. ज्याप्रमाणे शुभ कार्यापूर्वी तोंड गोड केले जाते, त्याचप्रमाणे बजेटपूर्वी हलवा समारंभ आयोजित करून तोंड गोड केले जाते. गेल्या वर्षी कोविड प्रोटोकॉलमुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता. अशा स्थितीत लोकांच्या मनात प्रश्न आहे की, यंदा हलवा सोहळा होणार का? जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

कशी झाली सुरुवात

हलवा समारंभ नेमका कधी आणि कसा सुरू झाला याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. वर्षानुवर्षे अर्थमंत्री ही परंपरा पाळत आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दस्तावेजीकरणानंतर त्याचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे अर्थसंकल्प कागदोपत्री नव्हता, तो डिजिटल पद्धतीने सादर करण्यात आला होता. त्यामुळे हलवा समारंभाची परंपराही खंडित झाली. जागोजागी मिठाई वाटण्यात आली. यंदा हलवा सोहळा होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.

असा साजरा केला जातो हलवा समारंभ

बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर हलवा समारंभ आयोजित केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. या कार्यक्रमात अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे सर्व अधिकारी सहभागी होतात. तिथे उपस्थित लोकांमध्ये हलवा वाटला जातो. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या प्रत्येक छोट्या पासून मोठ्या घटकांना यात सामविष्ट केले जाते.

या समारंभानंतर, बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व कर्मचारी-अधिकारी नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात जातात. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सादर केल्यानंतर ते सुमारे १० दिवसांनी बाहेर येतात. या १० दिवसांत हे कर्मचारी किंवा अधिकारी नाॅर्थ ब्लाॅकच्या तळघरात जाऊन राहतात. या दहा दिवसात त्यांचा त्यांच्या कुटूंबाशी, जगाशी कोणताही संबंध नसतो. हे कर्मचाऱी आणि अधिकारी अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे त्यांच्याकडून अर्थसंकल्पासंदर्भातील कोणतीही माहिती लिक होऊ नये हाच या तळघरात जाऊन राहण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असतो.

विभाग