मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bikaji IPO open : बिकाजी फूड्सचा आयपीओ खुला; शेअर वधारल्यानं गुंतवणूकदार खूष

Bikaji IPO open : बिकाजी फूड्सचा आयपीओ खुला; शेअर वधारल्यानं गुंतवणूकदार खूष

Nov 16, 2022, 03:42 PM IST

    • Bikaji IPO open : बिकाजी फूड्सच्या आयपीओवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर. कंपनी बीएसईवर ७ .०५ टक्के उसळीसह ३२१.१५ रुपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाला आहे.
Bikaji IPO HT

Bikaji IPO open : बिकाजी फूड्सच्या आयपीओवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर. कंपनी बीएसईवर ७ .०५ टक्के उसळीसह ३२१.१५ रुपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाला आहे.

    • Bikaji IPO open : बिकाजी फूड्सच्या आयपीओवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर. कंपनी बीएसईवर ७ .०५ टक्के उसळीसह ३२१.१५ रुपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाला आहे.

Bikaji IPO open : बिकाजी फूड्सच्या आयपीओवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर. कंपनी बीएसईवर ७ .०५ टक्के उसळीसह ३२१.१५ रुपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाला आहे. याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्सवर गुंतवणूक केली असेल ते अद्याप फायद्यात आहेत. याआधी, प्री ओपनिंग सेशनमध्ये घसरणीनंतर कंपनीने चांगली सुरुवात केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

प्री ओपनिंग सेशनमधील स्थिती

बिकाजीचा आयपीओ प्री ओपनिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या दिवसात गुंतवणूकदारांचा खराब प्रतिसाद मिळाला होता. प्री ओपनिंगदरम्यान शेअर्समध्ये १३ टक्के घट झाली होती. मात्र त्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी बाऊन्स बॅक केले आणि ६ टक्के प्रिमियम वाढीसह ट्रेड करत होता.

बिकाजी आयपीओला प्रतिसाद

आज हा आयपीओ २६.६७ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. अंदाजे ८८१ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अंदाजे २०६३६७९० शेअर्सची आँफर्स होती. बिकाजी फूड्सचा क्यूआयबी कोटा ८०.६३ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. तर नाॅन इन्स्टिट्यूशल इन्व्हेस्टरचा कोटा ७.१० पट सबस्क्राईब्ड झाला आहे. तर रिटेल इन्व्हेस्टरचा कोटा ४.७७ पट झाला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग