मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bikaji foods IPO : बिकाजीच्या आयपीओत गुंतवणूक करताय ? या बाबी ठेवा ध्यानात

Bikaji foods IPO : बिकाजीच्या आयपीओत गुंतवणूक करताय ? या बाबी ठेवा ध्यानात

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 04, 2022 03:58 PM IST

बिकाजीच्या आयपीओची इश्यू किंमत २८५-३०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, जर तुम्ही ग्रे मार्केट प्रिमियम (जीएमपी)वर नजर टाकली, तर शेअर बाजारात ३२७ रुपयांची लिस्टिंग होऊ शकते.

bikaji foods HT
bikaji foods HT

Bikaji foods IPO : आज ४ नोव्हेंबर रोजी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेडच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा (IPO) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आयपीओ ६७ टक्के सबस्क्राइब झाला. आता या फराळ आणि मिठाई बनवणाऱ्या कंपनीच्या आयपीओवर सट्टा लावणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. हे ग्रे मार्केट प्रीमियम अर्थात जीएमपीच्या संदर्भात समजले जाऊ शकते.

जीएसएमपी (GSMP) काय आहे

बिकाजी फूड्स आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सातत्याने घसरत आहे. शुक्रवारी ते २७ रुपयांपर्यंत घसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही घसरण दिसून येत आहे. स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचा आयपीओ सूचीबद्ध करण्यापूर्वी जीएमपीचा विचार केला जातो. आयपीओच्या यशाचे हे महत्त्वाचे माप आहे.

जीएमपीनुसार सूची

बिकाजीच्या आयपीओची इश्यू किंमत २८५-३०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. वरच्या किमतीनुसार, जर तुम्ही जीएमपीवर नजर टाकली तर शेअर बाजारात ३२७ रुपयांची लिस्टिंग होऊ शकते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ५० शेअर्स आहेत. म्हणजेच, गुंतवणूकदार प्रत्येक लॉटवर १३५० रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतात.

असा चालेल आयपीओ

- एनएसईवर उपलब्ध डेटानुसार, कंपनीच्या आयपीओला ऑफर केलेल्या १,३८,४३,६५० समभागांच्या तुलनेत एकूण २,०६,३६,७९० बोली प्राप्त झाल्या आहेत.

कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे. आयपीओ अंतर्गत, २,९३,७३,९८४ इक्विटी शेअर्स विक्रीसाठी (OFS) ऑफर केले जातात. कंपनीचा आयपीओ ७ नोव्हेंबरला बंद होणार आहे.

-हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस आहे. त्यामुळे कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. त्याच वेळी १६ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्टिंग अपेक्षित आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग