Health Care: जागतिक यकृत दिन दरवर्षी १९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी यकृताशी संबंधित आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अल्कोहोल पिण्यामुळे यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. याबद्दल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ दीपक भंगाळे यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात.