Manisha Kayande Slams Kirit Somaiya: मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बेकायदा बांधकामावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. विरोधकांची बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी थर्माकोलचे हातोडे घेऊन फिरणाऱ्या सोमय्यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी खराखुरा हातोडा देऊ केला आहे. सोमय्या यांनी राणेंच्या बेकायदा बंगल्यावर पहिला घाव घालावा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.