मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Ajit Pawar : सोम्या-गोम्यांचे प्रश्न मला विचारू नका; अजित पवारांनी सुनावले!

Ajit Pawar : सोम्या-गोम्यांचे प्रश्न मला विचारू नका; अजित पवारांनी सुनावले!

Jan 11, 2023 01:34 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 11, 2023 01:34 PM IST

Ajit Pawar on Bawankule and Padalkar : कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून शरद पवार शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करतात व बारामतीचा विकास करतात, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं. पवार साहेबांनी पैसे घेतले, असं एक शेतकरी जरी बोलला तरी मी राजकारण सोडून देईन, असं अजित पवार म्हणाले. बावनकुळे यांचं नाव न घेता अजितदादांनी त्यांना सणसणीत टोला हाणला. पवार साहेबांवर आरोप करणारा नेमका कोण आहे? त्यांना जनतेमध्ये किती आदर आहे? हे पाहून पत्रकारांनी प्रश्न विचारावेत. सोम्या-गोम्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारून पत्रकारांनी स्वत:चा आणि आमचाही वेळ घालवू नये, अशी विनंती अजित पवार यांनी केली. पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही त्यांनी एकेरी भाषेत टीका केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp