Prajakta Mali Naach Ga Ghuma: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अभिनयासोबतच व्यवसायात देखील पदार्पण केले. तिने 'प्राजक्तराज' या नावाने दागिन्यांचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. नुकताच 'नाच गं घुमा' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या कलाकारांसाठी प्राजक्ता माळी हिने खास दागिने डिझाईन केले होते.