Bharat Jodo Yatra In Jammu And Kashmir : दक्षिणेसह मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांचा प्रवास करत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मिरमध्ये दाखल झाली आहे. पदयात्रेच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मिरी पंडितांची भेट घेत त्यांच्या बरोबर भोजनाचा आस्वाद घेतला आहे. यावेळी काश्मिरी पंडितांनी राहुल गांधी यांच्यासोबत निवांत आणि मनमोकळेपणाने चर्चा केली. पुनवर्सन करण्याची मागणी करत काश्मिरी पंडितांनी आपल्या व्यथा राहुल गांधींसमोर मांडल्या आहेत.