Fashion Awards:आजीओ ग्राझिया इंडिया २०२४ चा सोहळा एक भव्य सोहळा होता. या यंग फॅशन अवॉर्ड्स २०२४ मध्ये बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. अनेक स्टार्सनी वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार पटकावले आहेत. विशेषत: श्रद्धा कपूर, करिश्मा कपूर, शोभिता धुलिपाला आणि साईन शेट्टी यांनी पुरस्कार पटकावले. मौनी रॉय, मृणाल ठाकूर, बॉबी देओल, करण जोहर, दिशा पटानी यांसारखे स्टार्स स्टेजवर खास आकर्षण होते.