Kapil Patil Speech Video : हुकूमशहाचा शेवट जवळ आला की त्याची तडफड सुरू होते. तसं सध्या देशातील सत्ताधाऱ्यांचं सुरू आहे. ४०० पारच्या घोषणा ते कितीही देवोत, भाजप २०० पार जाणार नाही हे लिहून ठेवा, असा विश्वास समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 'अमोल कीर्तीकर यांना घरातूनच विरोध असतानाही ते विचारांच्या बाजूनं उभे राहिले आहेत. तिथंच ते जिंकले आहेत. इंडिया आघाडीचे सर्व पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा शब्द कपिल पाटील यांनी यावेळी दिला.