मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL Awards : 'इमर्जिंग प्लेयर' ते 'पॉवरफुल स्ट्रायकर'… कोणत्या खेळाडूने कोणता पुरस्कार जिंकला? पाहा

WPL Awards : 'इमर्जिंग प्लेयर' ते 'पॉवरफुल स्ट्रायकर'… कोणत्या खेळाडूने कोणता पुरस्कार जिंकला? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 27, 2023 10:43 AM IST

WPL 2023 Awards Winners list : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिली महिला आयपीएल जिंकली आहे. चॅम्पियन संघाला कोणता पुरस्कार (WPL 2023 Awards list) आणि किती बक्षीस रक्कम मिळाली ते जाणून घ्या.

WPL 2023 Awards Winners list
WPL 2023 Awards Winners list

WPL 2023 final : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2203) पहिला हंगाम यशस्वीरीत्या पार पडला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना (२६ मार्च) रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC WPL FINAL ) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात दिल्लीचा ७ विकेट्सने पराभव करत महिला आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

दरम्यान, पहिली महिला आयपीएल संपल्यानंतर बहुतेकांच्या मनात एक प्रश्न आहे की विजेत्या संघाला बक्षीस रक्कम किती मिळाली. तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल, तर आम्ही तुम्हाला येथे विजेते, उपविजेते तसेच या स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.

महिला आयपीएलची बक्षीस रक्कम

महिला प्रीमियर लीग २०२३ जिंकणाऱ्या संघाला ६6 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचबरोबर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपयांची रक्कम मिळेल. याशिवाय, एलिमिनेटरमध्ये पराभूत झाल्यानंतर बाहेर पडलेल्या यूपी वॉरियर्स संघालाही १ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सच्या संघाला काहीही मिळणार नाही.

स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हे पुरस्कार मिळाले

सामनातील पॉवरफुल स्ट्रायकर - राधा यादव, (DC) ट्रॉफी आणि १ लाख रु.

सामनावीर - नॅट सीव्हर-ब्रंट, (MI) ट्रॉफी आणि २.५ लाख रुपये

पॉवरफुल स्ट्राइक ऑफ द सीझन - सोफी डिव्हाईन (RCB) ट्रॉफी आणि ५ लाख रु.

उदयोन्मुख खेळाडू (इमर्जिंग प्लेयर)- यास्तिका भाटिया (MI) - ट्रॉफी आणि ५ लाख रु.

फेअरप्ले पुरस्कार - मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स

हंगामातील सर्वोत्तम कॅच - हरमनप्रीत कौर (MI) ट्रॉफी आणि ५ लाख रुपये

सर्वाधिक बळी, पर्पल कॅप - हेली मॅथ्यूज (MI) - ट्रॉफी आणि ५ लाख रु.

सर्वाधिक धावा, ऑरेंज कॅप - मेग लॅनिंग (DC) - ट्रॉफी आणि ५ लाख रु.

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन - हेली मॅथ्यूज (MI) - ट्रॉफी आणि ५ लाख रु.

WhatsApp channel