मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL Auction : स्टार स्पोर्ट्सवर नाही, या चॅनल-अ‍ॅपवर दिसणार महिला प्रीमियर लीगचा लिलाव, जाणून घ्या

WPL Auction : स्टार स्पोर्ट्सवर नाही, या चॅनल-अ‍ॅपवर दिसणार महिला प्रीमियर लीगचा लिलाव, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 12, 2023 12:50 PM IST

where to watch WPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. यामध्ये एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत.

WPL Auction 2023
WPL Auction 2023

महिला प्रीमियर लीगची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. यामध्ये एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी १३ फेब्रुवारीला खेळाडूंचे ऑक्शन होणार आहे.

या लिलावात ५ फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनच्या पहिल्या लिलावासाठी १५२५ खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, बीसीसीआयनुसार केवळ ४०९ खेळाडूंवरच बोली लावता येणार आहे.

प्रत्येक फ्रँचायझीकडे १२-१२ कोटी रुपयांची लिलाव पर्स असणार आहे. या रकमेसह, प्रत्येक संघ किमान १५ आणि जास्तीत जास्त १८ खेळाडू खरेदी करू शकतो. म्हणजेच एकूण ९० स्लॉट उपलब्ध आहेत.

या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंसाठी १० आणि २० लाख रुपयांची बेस प्राईस ठेवण्यात आली आहे. तर कॅप्ड खेळाडूंसाठी ३०, ४० आणि ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसची श्रेणी तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

महिला प्रीमियर लीगचा लिलाव कुठे होईल?

महिला प्रीमियर लीगचा लिलाव मुंबईत होणार आहे.

महिला प्रीमियर लीगचा लिलाव किती वाजता सुरू होईल?

महिला प्रीमियर लीगचा लिलाव सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

महिला प्रीमियर लीगचा लिलाव कोणत्या टीव्ही चॅनेलवर दिसणार आहे?

महिला प्रीमियर लीग लिलावाचे प्रसारण हक्क Viacom18 ला विकले गेले आहेत. अशा परिस्थितीत, प्रेक्षक टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क या चॅनेलवर लिलावाचा आनंद घेऊ शकतात. सोबतच, जिओ सिनेमावर महिला प्रीमियर लीग लिलावाचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या