भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सध्या सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. नुकताच, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून आणि फोटोचे कॅप्शन वाचून आनंदचे चाहते काळजीत पडले होते. पण काही वेळात सर्वकाही ठीक असल्याचे समोर आले.
वास्तविक, विश्वनाथन आनंदने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अतिश गंभीर मुद्रेत उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो एका विमानतळावरील आहे. आनंदने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी एका विमानतळावर आहे. माझे अपहरण झाले आहे. मी अपहरणकर्त्यांना विनंती करतो की मला सोडून द्यावे".
हा फोटो काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी कमेंट करून आनंदबाबत काळजी व्यक्त केली. पण काही वेळानंतर आनंदनेच कमेंट करून आपण ठीक असल्याचे सांगितले.
वास्तविक, हा फोटो २९ फेब्रुवारीचा असल्याचे आनंदने सांगितले. एका स्पर्धेनंतर अँड्रिया आणि अलेक्झांड्रा बोटेज यांनी हा फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते, असे का वाटत आहे की आम्ही आनंदला किडनॅप केले आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी आनंदनेदेखील अशाच कॅप्शनसह हा फोटो पोस्ट केला.
अँड्रिया आणि अलेक्झांड्रा बोटेज या दोघी बहिणी आहेत. २०१६ मध्ये अलेक्झांड्राने एक सोशल मीडिया चॅनेल सुरू केले. या चॅनेलवर त्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करतात. अल्पावधीतच हे चॅनेल खूप लोकप्रिय झाले. यानंतर २०२० मध्ये अलेक्झांड्राची बहीण अँड्रियादेखील सोबत आली आणि दोघींनी बोटेज लाईव्ह नावाने चॅनेल सुरू केले. या चॅनेलचे २७ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.