मराठी बातम्या  /  क्रीडा  /  हद्दच झाली! शोएब अख्तरनं विराटच्या संभाव्य निवृत्तीची वेळच सांगून टाकली

हद्दच झाली! शोएब अख्तरनं विराटच्या संभाव्य निवृत्तीची वेळच सांगून टाकली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 15, 2022 12:10 PM IST

Shoaib Akhtar On Virat Kohli: शोएब अख्तरच्या आधी शाहिद आफ्रिदीनेसुद्धा विराटला निवृत्तीचा सल्ला दिला होता. तसंच त्याच्या एका चांगल्या कारकिर्दीचं कौतुक केलं होतं.

विराट कोहली
विराट कोहली (फोटो - बीसीसीआय ट्विटर)

Shoaib Akhtar On Virat Kohli: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टी२० वर्ल्ड कपनंतर विराट कोहली टी२० मधून निवृत्ती घेण्याचा विचार करू शकतो असं अख्तरने म्हटलं आहे. विराट कोहलीला नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याचा हरवलेला सूर गवसला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा तो दुसरा खेळाडू आहे. ५ सामन्यात दोन वेळा नाबाद राहत त्याने एका शतकासह २७६ धावा केल्या.

टी२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून त्यात विराट कोहलीसुद्धा आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरने विराट कोहलीबाबत धक्कादायक दावा केला आहे. विराट कोहली त्याच्या निवृत्तीचा विचार करू शकतो. इतर फॉरमॅटमध्ये जास्त काळ खेळत राहण्यासाठी तो टी२० तून निवृत्त घेऊ शकतो. मी त्याच्या जागी असतो तर असंच केलं असतं असंही शोएब अख्तरने म्हटलं आहे.

शोएब अख्तरच्या आधी शाहिद आफ्रिदीनेसुद्धा विराटला निवृत्तीचा सल्ला दिला होता. तसंच त्याच्या एका चांगल्या कारकिर्दीचं कौतुक केलं होतं. चांगल्या फॉर्ममध्ये असताना विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा. संघाने बाहेर बसवल्यानंतर निवृत्ती घ्यायला नको असं शाहिद आफ्रिदी म्हणाला होता.

आशिया कपमध्ये विराटनं त्याचं टी२० मधील पहिलं शतक झळकावलं. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच हे ७१ वं शतक ठरलं. विशेष म्हणजे २०१९ पासून विराट कोहलीला शतक करत आलं नव्हतं, त्याच्या चाहत्यांची शतकाची ही प्रतिक्षा आशिया कपमध्ये संपली. विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान १०० सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. त्याने १०२ कसोटी, १०४ टी२० आणि २६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर टी२० मध्ये त्याने ५१.९४ च्या सरासरीने ३५८४ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग