मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Cricket Schedule: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, पुढील ३ महिने फक्त क्रिकेट

Team India Cricket Schedule: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, पुढील ३ महिने फक्त क्रिकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 08, 2022 07:33 PM IST

Border Gavaskar Trophy, Team India Cricket Schedule: श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भारतात येणार आहेत. या मालिकांचे वेळापत्रक BCCI ने आज (८ डिसेंबर) जाहीर केले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात असेल.

Team India Cricket Schedule
Team India Cricket Schedule

टीम इंडिया सध्या बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर भारताला बांगलादेशमध्येच कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेनंतरही भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त राहणार आहे. भारतीय संघाचे देशांतर्गत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. पुढील ३ महिन्यांत तीन देशांचे संघ भारतात येणार आहेत. भारतीय संघ मार्चपर्यंत सातत्याने सामने खेळणार आहे.

श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भारतात येणार आहेत. या मालिकांचे वेळापत्रक BCCI ने आज (८ डिसेंबर) जाहीर केले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात असेल.

श्रीलंकेला भारतात ३ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर न्यूझीलंडही ३ वनडे, ३ टी-20 सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचा दौरा मोठा असणार आहे. कारण या दौऱ्यात ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी तसेच ३एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

भारत - श्रीलंका मालिका २०२३:

टी-20 मालिका

• पहिला T20 - ३ जानेवारी (मुंबई)

• दुसरा T20 - ५ जानेवारी (पुणे)

• तिसरा T20 - ७ जानेवारी (राजकोट)

वनडे मालिका

• पहिला वनडे - १० जानेवारी (गुवाहाटी)

• दुसरा वनडे - १२ जानेवारी (कोलकाता)

• तिसरा वनडे - १५ जानेवारी (तिरुवनंतपुरम)

भारत - न्यूझीलंड मालिका २०२३:

वनडे मालिका

• पहिला वनडे - १८ जानेवारी (हैदराबाद)

• दुसरा वनडे - २१ जानेवारी (रायपूर)

• तिसरा वनडे - २४ जानेवारी (इंदौर)

टी-20 मालिका

• पहिला T20 - २७ जानेवारी (रांची)

• दुसरा T20 - २९ जानेवारी (लखनौ)

• तिसरा T20 - १ फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत - ऑस्ट्रेलिया मालिका २०२३:

कसोटी मालिका

• पहिली कसोटी - ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी (नागपूर)

• दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी (दिल्ली)

• तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च (धर्मशाला)

• चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)

वनडे मालिका

• पहिला वनडे - १७ मार्च (मुंबई)

• दुसरा वनडे - मार्च १९ (विशाखापट्टणम)

• तिसरा वनडे - २२ मार्च (चेन्नई)

विशेष म्हणजे, २०२३ मध्ये वनडे वर्ल्डकपदेखील होणार आहे. त्याआधी टीम इंडिया सतत क्रिकेट खेळणार आहे. बीसीसीआयने नुकतेच ३ महिन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानंतर आयपीएल मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत २०२३ मध्ये चाहत्यांना भरपूर क्रिकेट पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या