मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : Swiggy नं घेतली विराटची बाजू, ट्विट करत नवीन उल हकला डिवचलं, काय घडलं? पाहा

IPL 2023 : Swiggy नं घेतली विराटची बाजू, ट्विट करत नवीन उल हकला डिवचलं, काय घडलं? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 19, 2023 09:39 PM IST

swiggy taunts naveen ul haq after virat kohli century : कोहलीने ६३ चेंडूत शानदार शतक झळकावले. कोहलीच्या या शानदार शतकी खेळीनंतर कोहलीचे चाहते खूप खूश आहेत, तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

swiggy taunts naveen ul haq after virat kohli century
swiggy taunts naveen ul haq after virat kohli century

virat kohli ipl century vs srh : आयपीएल 2023 चा ६५वा सामना RCB आणि हैदराबाद (SRH vs RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉइंट टेबलवर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

या सामन्यात कोहलीने ६३ चेंडूत शानदार शतक झळकावले. कोहलीच्या या शानदार शतकी खेळीनंतर कोहलीचे चाहते खूप खूश आहेत, तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकला ((swiggy taunts naveen ul haq virat kohli century)) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

स्विगीची सोशल मीडिया पोस्ट

या दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही विराटचे कौतुक करताना नवीन उल हकला ट्रोल केले आहे. विराटच्या शतकानंतर स्विगीने एक मजेशीर ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये स्विगीने लिहिले की, "सॉरी मँगो, चिकू हाच खरा राजा आहे."

खरं तर, या मोसमात १ मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार राडा झाला होता. हा सामना संपल्यानंतरही नवीन-उल-हकने प्रकरण शांत होऊ दिले नाही. वास्तविक, भांडणानंतर नवीनने एक सोशल मीडियावर विराटला डिवचले होते.

वानखेडेवर झालेल्या मुंबई-आरसीबी सामन्यात विराट कोहली विशेष काही करू शकला नाही आणि अवघी एक धाव काढून तंबूत परतला. कोहली बाद होताच लखनौ सुपर जायंट्सच्या नवीन-उल-हकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला.

नवीनच्या दोन इन्स्टा स्टोरी

नवीनच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामना टीव्हीवर दिसत होता. तर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "आंबे खूप गोड आहेत."

तसेच, नवीन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सामना संपल्यानंतर आणखी एक स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये पुन्हा काही आंब्याचे फोटो आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा दिसत होते. सुर्या आणि वढेराने मुंबईच्या विजयाचे हिरो होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या