मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI जातीयवादी? टीम इंडियात एकाच जातीला स्थान मिळतं, ट्विटरवर #CastistBCCI ट्रेंड

BCCI जातीयवादी? टीम इंडियात एकाच जातीला स्थान मिळतं, ट्विटरवर #CastistBCCI ट्रेंड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 25, 2022 03:53 PM IST

BCCI casteist controversy: फॉर्मात असलेले सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांची बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. या दौऱ्यासाठी टीम इंडियातून सूर्या आणि संजूला वगळल्याची बातमी पसरताच ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. काही वेळातच #CastistBCCI हा ट्रेंडिंग हॅशटॅग बनला आणि जवळपास लाखभरांहून अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरून पोस्ट लिहिल्या आहेत.

BCCI casteist controversy
BCCI casteist controversy

बांगलादेश दौऱ्यसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी संजू सॅमसन आणि सुर्यकुमार यादव यांची निवड झालेली नाही. यावरून या दोघांचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच, काही चाहत्यांनी तर BCCI जात पाहून टीम इंडियामध्ये खेळाडूंची निवड करते का? असा प्रश्न विचारला आहे.

फॉर्मात असलेले सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांची बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. या दौऱ्यासाठी टीम इंडियातून सूर्या आणि संजूला वगळल्याची बातमी पसरताच ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. काही वेळातच #CastistBCCI हा ट्रेंडिंग हॅशटॅग बनला आणि हजारो लोकांनी हा हॅशटॅग वापरून पोस्ट लिहिल्या आहेत.

पंतपेक्षा संजूची कामगिरी चांगली

ऋषभ पंत सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला टीम इंडियात संधी देण्यात येत आहे. यालाही विरोध होत आहे. पंतने आतापर्यंत २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ८४० धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये तर त्याची कामगिरी आणखी खराब आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ६६ सामन्यांमध्ये केवळ ९८७ धावा केल्या आहेत. पंतपेक्षा केरळचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा दावा अधिक मजबूत असल्याचे चाहत्यांचे मत आहे. सॅमसनने आतापर्यंत १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ७३.५० च्या सरासरीने २९४ धावा केल्या आहेत. संजूला भारताकडून सातत्याने खेळण्याची संधी मिळाली नाही. 

तर सूर्यकुमार यादवला बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. सूर्या जुलैपासून सतत क्रिकेट खेळत असून विश्वचषकानंतर तो न्यूझीलंडविरुद्धही खेळला. मात्र, सूर्याच्या चाहत्यांना हा निर्णय फारसा रुचलेला नाहीये. आधीच त्याला भारताकडून खेळण्याची संधी खूप उशिराने मिळाली, अशा परिस्थितीत तो चांगली फलंदाजी करत असताना त्याला जास्तीत जास्त सामने दिले पाहिजेत, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये मागास जाती आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभाव

जातीवादी बीसीसीआय हॅशटॅगसह लिहिलेल्या अनेक पोस्टमध्ये बोर्ड एका जातीला (ब्राह्मण) अधिक प्राधान्य देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भारतातील ११ खेळाडूंपैकी ७ ब्राह्मण आहेत. सध्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे देखील ब्राह्मण आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये मागास जाती आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभाव होत असल्याचा आरोपही मंडल यांनी केला आहे. याच्या समर्थनार्थ, त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टनुसार भारतासाठी कसोटी खेळलेल्या ३०२ क्रिकेटपटूंपैकी केवळ ५% मुस्लिम आहेत. त्याच वेळी, अनुसूचित जातींना केवळ ८% प्रतिनिधित्व मिळाले आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचा वाटा सुमारे १५% आहे आणि अनुसूचित जाती जमातींचा वाटा २५% आहे.

 

WhatsApp channel