मराठी बातम्या  /  क्रीडा  /  गुजरातविरुद्धचा पराभव जिव्हारी, आरसीबीच्या चाहत्यांचे गिल आणि त्याच्या बहिणीसोबत संतापजनक कृत्य

गुजरातविरुद्धचा पराभव जिव्हारी, आरसीबीच्या चाहत्यांचे गिल आणि त्याच्या बहिणीसोबत संतापजनक कृत्य

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 22, 2023 04:42 PM IST

आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचा पराभव केला.

 Shahneel Gill and Shubman Gill
Shahneel Gill and Shubman Gill

IPL 2023: आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या पराभवासह आरसीबीचे पुन्हा आयपीएलच्या जिंकण्याचे स्वप्न भंगले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातसमोर १९८ धावांचे आव्हान ठेवले.प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाने पाच चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. गुजरातच्या विजयात सलामीवीर शुभमन गिलचा मोलाचा वाटा उचलला. गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचे चाहते नाराज झाले आहेत. आरसीबीच्या पराभवाला गिल जबाबदार असल्याचे चाहते म्हणत आहेत. या पराभवानंतर आरसीबीच्या चाहते गिल आणि त्याच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह कमेंट करताना दिसत आहेत.

या सामन्यात शुभमन गिलने ५२ चेंडूत १०४ धावांची नाबाद खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकारांचाही समावेश आहे. गिलच्या या सर्वोत्तम खेळीने आरसीबीचे चाहते दु:खी झाले. दरम्यान, आरसीबीच्या चाहत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. काही चाहते गिलच्या बहिणीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करत आहेत.

आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर गिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. यावर गिलच्या बहिणी शहनीलने कमेंट केली. यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी शहनीलबाबत आक्षेपार्ह कमेंट करायला सुरुवात केली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या शेवटच्या पोस्टवर अनेक घाणेरड्या कमेंट्स केल्या जात आहेत. ही पोस्ट शाहनीलने काही वेळापूर्वी लखनौ आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान केली होती. यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत मॅच एन्जॉय करण्यासाठी एकना स्टेडियमवर गेली होती.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिलने जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने सलग दोन साखळी सामन्यात दोन शतके झळकावली. ऑरेंज कॅप यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या फाफ डू प्लेसिसच्या अगदी जवळ पोहोचला आहे. गिलने आतापर्यंत १४ डावांत ५६.६७ च्या सरासरीने ६८० धावा केल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग