मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : दोघेही हुंड्याबद्दल बोलत असावेत, सचिन-शुभमनच्या भेटीनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस, एकदा पाहाच!

Shubman Gill : दोघेही हुंड्याबद्दल बोलत असावेत, सचिन-शुभमनच्या भेटीनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस, एकदा पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 27, 2023 05:01 PM IST

Shubman Gill sachin tendulkar memes : शुभमनने यावर्षी टी-20 मध्ये ४ शतके झळकावली आहेत. तो सध्या टीम इंडियासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

Shubman Gill sachin tendulkar
Shubman Gill sachin tendulkar

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : भारतीय क्रिकेटमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे देशातील फलंदाजांच्या कारकिर्दीच्या शेवटी, एक नवीन महान फलंदाज तयार होतो. ही प्रक्रिया गेली अनेक दशके सुरू आहे. सुनील गावसकर यांची कारकीर्द संपुष्टात येत असताना सचिन तेंडुलकरच्या रूपाने देशाला एक महान फलंदाज मिळाला.

सचिननंतर टीम इंडियाची बॅटिंग विराट कोहलीने सांभाळली. आता शुभमन गिल हा विराट कोहलीचा पुढचा उत्तराधिकारी असेल, असेल असे बोलले जात आहे. कारण शुभमन गिलने ज्या पद्धतीने कारकिर्दीची सुरुवात केली आहे त्यावरून तो येणाऱ्या काळात महान फलंदाज होऊ शकतो याची झलक दिसते.

शुभमनची यावर्षी टी-20 मध्ये ४ शतके

शुभमनने यावर्षी टी-20 मध्ये ४ शतके झळकावली आहेत. तो सध्या टीम इंडियासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. 2023 च्या आयपीएल हंगामात शुभमनने ३ शतके झळकावली आहेत. क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध शुभमनने ६० चेंडूत १२९ धावांचा पाऊस पाडला. गुजरात टायटन्सने हा सामना ६२ धावांनी जिंकला.

सचिन-शुभमनची भेट व्हायरल

मुंबई-गुजरात सामना संपल्यानंतर शुभमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मॅचनंतर सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. या दोघांच्या संभाषणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सचिन-शुभमनच्या भेटीनंतर भन्नाट मीम्स

शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकरी भन्नाट मीम्स बनवत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'शुभमन अन् साराच्या लग्नाची सुपारी फुटणार.' दुसऱ्या यूजरने म्हटले की, दोघेही हुंड्याबद्दल बोलत असावेत.

सामन्यानंतर गिल काय म्हणाला?

सामन्यानंतर गिल म्हणाला, "माझा बॉल टू बॉल खेळण्यावर विश्वास आहे. ज्या षटकात मी ३ षटकार मारले, त्यामुळे आम्हाला सामन्याला खूप गती मिळाली. या विकेटवर फलंदाजी करणे सोपे होते."

WhatsApp channel