मराठी बातम्या  /  क्रीडा  /  असं काय घडलंय? BCCI चाहत्यांच्या निशाण्यावर, खतरनाक मीम्सचा पाऊस

असं काय घडलंय? BCCI चाहत्यांच्या निशाण्यावर, खतरनाक मीम्सचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 07, 2022 05:44 PM IST

रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्यानंतर मात्र, क्रिकेट चाहते संतापले आहेत, त्यांनी BCCI ला अनेक प्रश्न विचारले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिज दौऱ्यावर (india vs west indies) होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला (shikhar dhawan) वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्यानंतर मात्र, क्रिकेट चाहते संतापले आहेत, त्यांनी BCCI ला अनेक प्रश्न विचारले आहेत.

कारण, आयपीएलनंतर लगेच रोहित शर्माने विश्रांतीची मागणी केली होती. त्यामुळे रिषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपद भूषवले तर हार्दिक पांड्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार झाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यावेळी रोहित कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्यामुळे तो निर्णायक कसोटी सामनाही खेळू शकला नाही. आता तो इंग्लंडमध्ये फक्त टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे रोहितला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती का देण्यात आली. सोबतच एखाद्या कर्णधाराला एवढ्या वेळेस विश्रांती कशी काय दिली जावू शकते, असे प्रश्न क्रिकेट चाहते उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, यावर्षी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा शिखर धवन हा ७ खेळाडू आहे. सात महिन्यांत ७ खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले असून संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत परदेशात एकही सामना खेळलेला नाही. यानंतर संतापलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयची खिल्ली उडवली आहे. बीसीसीआय कांदे- बटाटे विकत असल्यासारखे कर्णधारपद वाटत सुटले आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ICC T20 विश्वचषक २०२१ नंतर लगेचच रोहित शर्माला भारतीय T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. विराट कोहलीने या स्पर्धेपूर्वीच टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर एक एक करत रोहितकडे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद आले.

WhatsApp channel