मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 Blast 2023 : गोलंदाजानं बॅटनं आणलं वादळ, ३४ चेंडूत शतक, ठोकले तब्बल इतके षटकार

T20 Blast 2023 : गोलंदाजानं बॅटनं आणलं वादळ, ३४ चेंडूत शतक, ठोकले तब्बल इतके षटकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 27, 2023 06:44 PM IST

Sean Abott Hundred T20 Blast : टी-20 ब्लास्ट स्पर्धेत सरेकडून खेळताना शॉन अॅबॉटने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने अवघ्या ३४ चेंडूत शतक ठोकले.

Sean Abott Hundred T20 Blast
Sean Abott Hundred T20 Blast

Sean Abott Hundred T20 Blast : टी-२० क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. या फॉरमॅटमध्ये रोज नवे रेकॉर्ड बनले जातात आणि मोडले जातात. २० षटकांच्या क्रिकेटमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करण्याचे काम केवळ बलवान फलंदाजच करतात. पण एका गोलंदाजाने टी-20 सामन्यात बॅटने धुमाकूळ घातल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले तर कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या टी-20 ब्लास्ट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉन अॅबॉटने (sean abott t20 blast century) हा पराक्रम करून दाखवला आहे.

शॉन अॅबॉटने बॅटने घातला धुमाकूळ

टी-20 ब्लास्ट स्पर्धेत सरेकडून खेळताना शॉन अॅबॉटने केंट संघाविरूद्ध (Surrey vs Kent highlights) चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. अॅबॉट क्रीझवर आला तेव्हा संघाची धावसंख्या ४ बाद ६४ अशी होती. संघ अडचणीत होता. मात्र, अॅबॉटने सामन्याचे रूपच बदलून टाकले. या झंझावाती खेळीदरम्यान अॅबॉटने ४ चौकार आणि ११ गगनचुंबी षटकार ठोकले. शॉन अॅबॉटने अवघ्या ३४ चेंडूत शतक पूर्ण केले.

अ‍ॅबॉटने ४१ चेंडूत नाबाद ११० धावांचा पाऊस पाडला. या खेळीमुळे सरे संघाने स्कोअर बोर्डवर ५ गडी गमावून २२३ धावा केल्या.

सायमंड्सच्या विक्रमाशी बरोबरी

इंग्लिश भूमीवर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम संयुक्तपणे शॉन अॅबॉटच्या नावावर आहे. अॅबॉटच्या आधी अॅण्ड्रयू सायमंड्सने २००४ मध्ये इंग्लंडमध्ये मिडलसेक्सकडून खेळताना ३४ चेंडूत शतक झळकावले होते. अ‍ॅबॉटने आता सायमंड्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

टी-२० मधील चौथे वेगवान शतक

शॉन अॅबॉटचे झंझावाती शतक हे टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील चौथे जलद सर्वात शतक आहे. २० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, गेलने केवळ ३० चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत गेलनंतर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव आहे. पंतने टी-20 क्रिकेटमध्ये ३२ चेंडूत शतक झळकावले आहे. या फॉरमॅटमधील तिसरे सर्वात वेगवान शतक विहान लुब्बेच्या बॅटमधून आले, त्याने २०१८ मध्ये केवळ ३३ चेंडूत शतक झळकावले होते.

WhatsApp channel