Rohit Sharma : रोहित शर्मा बनला नवा सिक्सर किंग, धोनीचा 'हा' विक्रम मोडला
Rohit Sharma India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो भारतीय भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हैदराबाद वनडेत रोहितने ही कामगिरी केली.
India vs New Zealand 1st odi : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एक विक्रम रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हैदराबाद वनडेमध्ये त्याने धमाकेदार सुरुवात केली आणि दोन शानदार षटकार ठोकले. यासह रोहित शर्माने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खरंतर, रोहित शर्मा भारतीय भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हैदराबाद वनडेत रोहितने ही कामगिरी केली.
रोहित शर्मा भारतात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज
या सामन्यात रोहितने ३८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. यासह रोहित शर्माचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर एकूण १२५ षटकार झाले आहेत. तो भारतात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने भारतातील १३० एकदिवसीय सामन्यांमध्ये १२५ षटकार ठोकले आहेत. धोनीने भारतात १२३ षटकार मारले आहेत.
भारतीय भूमीवर वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा - १२५ षटकार
एमएस धोनी - १२३ षटकार
सचिन तेंडुलकर - ७१ षटकार
विराट कोहली - ६६षटकार
युवराज सिंग - ६५ षटकार