मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rafael Nadal ATP Rankings: तब्बल १८ वर्षानंतर स्टार टेनिसपटू राफेल नदाल अव्वल १० मधून बाहेर

Rafael Nadal ATP Rankings: तब्बल १८ वर्षानंतर स्टार टेनिसपटू राफेल नदाल अव्वल १० मधून बाहेर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 21, 2023 05:11 PM IST

Rafael Nadal: उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टेनिसजगतात छाप सोडणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल तब्बल १८ वर्षानंतर एटीपी क्रमवारीच्या अव्वल १० मधून बाहेर झाला आहे.

Rafael Nadal
Rafael Nadal

Rafael Nadal ATP Rankings: स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल एटीपी क्रमवारीतील अव्वल १० मधून बाहेर पडला आहे. जवळपास १८ वर्षानंतर राफेल नदाल एटीपी क्रमवारीत अव्वल १० मध्ये होता. एप्रिल २००५ नंतर राफेल नदाल पहिल्यांदाच अव्वल १० मधून बाहेर झाला आहे. एटीपीच्या ताज्या क्रमवारीनुसार, राफेल नदाल १३ व्या स्थानावर आहे. दुखापतीमुळे राफेल नदालला अनेक स्पर्धांना मुकावे लागले, ज्याचा फटका त्याला एटीपी क्रमवारीत बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रविवारी झालेल्या इंडियन वेल्स मास्टर्सच्या फायनलमध्ये स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीच्या पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. स्पर्धेच्या निकालांमुळे एटीपीच्या क्रमवारीत बदल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानुसार, राफेल नदालची चार स्थानांनी घसरण झाली आहे. यापूर्वी तो नवव्या स्थानावर होता. नदाल ९१२ आठवडे एटीपी क्रमवारीत अव्वल १० मध्ये राहिला, हा एक विक्रम आहे.

नदालने सप्टेंबर २००१ मध्ये व्यावसायिक सामने खेळायला सुरुवात केली,तेव्हा तो पहिल्या १००० मध्येही नव्हता. दरम्यान, नोव्हेंबर २००१ मध्ये त्याने ८१६ स्थानावर झेप घेतली. २००२ च्या जुलैपर्यंत नदाल अव्वल ५०० च्या क्रमावारीत दाखल झाला. अवघ्या पाच महिन्यात त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आणि अव्वल २०० मध्ये प्रवेश केला. त्यानंतर ३१ मार्च २००३ रोजी जाहीर झालेल्या एफटीपीच्या क्रमवारीत तो ११४ व्या क्रमांकावर पोहचला होता. तीन आठवड्यानंतर त्याने अव्वल १०० मध्ये जागा मिळवली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला याचवर्षी एटीपीकडून इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला.

दरम्यान, २००३ च्या अखिरेस नदाल जागतिक क्रमावारीत ४९ व्या क्रमांकावर होता. नदलने २५ एप्रिल २००४ रोजी एटीपीच्या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेप घेऊन अव्वल १० मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून हा खेळाडू अव्वल १० मधून बाहेर पडला नाही. जवळपास १८ वर्षानंतर नदालने अव्वल १० मधील स्थान गमावले आहे. नदालने २००५ मध्ये फ्रेंच ओपनच्या रूपात पहिले ग्रँडस्लॅम जिंकले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

WhatsApp channel

विभाग