'विराट सर…' सामना पाहायला आलेल्या मुलाचं पोस्टर चर्चेत...
पावसामुळे खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारताच्या पाच विकेट्स पडल्या आहेत. खेळ थांबण्यापूर्वी भारताने ३७.२ षटकात १३३ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया (team india) एक टेस्ट मॅच, तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मालिकेपूर्वी भारतीय संघ ग्रेस रोड मैदानावर आजपासून लीसेस्टरशायरविरुद्ध (Leicestershire) सराव सामना (Warm-up-Match) खेळत आहे. या ४ दिवसीय सराव सामन्यादरम्यान एका मुलाने मैदानात दाखवलेले पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे. भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यातील सराव सामना पाहण्यासाठी हा मुलगा आला आहे. या मुलाने त्याच्या पोस्टरवर लिहिले आहे की, "विराट सर तुम्ही बेस्ट आहात, तुम्हाल पाहण्यासाठी मी माझी शाळा बुडवून आलो आहे".
भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यातील सराव सामना पाहण्यासाठी आलेल्या या मुलाचे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या सराव सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय संघाच्या पूर्णपणे अंगलट आला. लीसेस्टरशायरच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी पुर्णपणे ढेपाळल्याचे दिसली.
पावसामुळे खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारताच्या पाच विकेट्स पडल्या आहेत. खेळ थांबण्यापूर्वी भारताने ३७.२ षटकात १३३ धावा केल्या आहेत. विराट कोहली ३२ आणि केएस भरत ११ धावांवर खेळत आहेत. त्यापूर्वी भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताचे सलामीवी कर्णधार रोहित शर्माने ४७ चेंडूत २५ धावा केल्या, तर शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी हनुमा विहार ३ तर श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाला. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा १३ धावांवर बाद झाला.