मराठी बातम्या  /  Sports  /  Pcb Chairman Najam Sethi On Asia Cup 2023 And World Cup 2023 Says I Have Kept My Options Open

BCCI vs PCB : लक्षात ठेवा, हे प्रकरण आशिया चषकापुरतं मर्यादित नाही; पीसीबीची बीसीसीआयला धमकी

BCCI vs PCB
BCCI vs PCB
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 14, 2023 11:54 AM IST

asia cup 2023 india vs pakisatn : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी या वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या आशिया चषक आणि भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या पुढील बैठकीत आपण हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही सेठी यांनी सांगितले आहे.

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी (१३ मार्च) पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलताना म्हणाले की,, 'आमच्यासमोर गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, पण जेव्हा मी एसीसी आणि आयसीसीच्या बैठकीत जाईन तेव्हा मला सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील. मात्र, आपण आता परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे. आशिया चषक स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. जर भारतीय संघ आशिया चषकासाठी आपल्या देशाचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तान संघालाही एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात न पाठवण्याचा विचार करावा लागेल, असेही सेठी म्हणाले.

इतर संघ येत आहेत, मग भारताला सुरक्षेची चिंता का ?

सोबतच, “मी माझे पर्याय खुले ठेवले आहेत कारण जेव्हा सर्व संघ पाकिस्तानमध्ये येत आहेत आणि सुरक्षेचा प्रश्न नाही, तेव्हा भारताला सुरक्षेची चिंता का आहे? मी आगामी मीटिंगमध्ये हे अधोरेखित करेन की जर भारताला समस्या असेल तर आमच्या संघालाही भारतात विश्वचषकादरम्यान सुरक्षेची चिंता आहे. या महिन्यात आयसीसीचे सीईओ आणि कार्यकारी मंडळाच्या बैठका होणार आहेत. सेठी आणि पीसीबीचे प्रतिनिधीत्व करणारे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आशिया कप आयोजित करायचा आहे

सेठी म्हणाले की, “आम्ही भारताच्या भूमिकेचे समर्थन करत नाही कारण आम्हाला आशिया चषक आयोजित करायचा आहे. सोबतच हेदेखील लक्षात ठेवा की हा केवळ आशिया चषक आणि विश्वचषकाचा प्रश्न नाही. २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचाही मुद्दा आहे”.

WhatsApp channel

संबंधित बातम्या