मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs DC Highlights : दिल्लीनं ९ षटकांत ११० धावांचं लक्ष्य गाठलं, मुंबईचा लाजिरवाणा पराभव

MI vs DC Highlights : दिल्लीनं ९ षटकांत ११० धावांचं लक्ष्य गाठलं, मुंबईचा लाजिरवाणा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 20, 2023 07:10 PM IST

MI vs DC Live Score : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या.

MI vs DC Live Score
MI vs DC Live Score

WPL Cricket Score, MUM vs DEL Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगच्या १८व्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला आहे. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत आठ बाद १०९ धावाच करू शकला. दिल्लीने नऊ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११० धावा करून सामना जिंकला.

MI vs DC WPL 2023 Score UPDATES

दिल्लीचा धमाकेदार विजय

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या. एलिस कॅप्सीने सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. १७ चेंडूंच्या खेळीत तिने फक्त एक चौकार मारला तर कॅप्सीच्या बॅटमधून ५ षटकार निघाले. कर्णधार मेग लॅनिंग २२ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिली. तिने ४ चौकार मारले. 

शेफाली वर्माने १५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. लॅनिंग आणि शेफाली यांनीही प्रत्येकी एक षटकार ठोकला. हीली मॅथ्यूजने मुंबईला एकमेव यश मिळवून दिले.

MI vs DC Live Score: दिल्ली विजयाच्या जवळ

दिल्ली कॅपिटल्सचा संघ हळूहळू विजयाच्या जवळ जात आहे. त्यांनी सात षटकात एका विकेटच्या मोबदल्यात ८९ धावा केल्या आहेत. कर्णधार मेग लॅनिंग १८ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे. त्याचवेळी शेफाली वर्मानंतर आलेली अॅलिस कॅप्सीही वेगाने धावा करत आहे. कॅप्सी ९ चेंडूत २० धावांवर खेळत आहे. दिल्लीला विजयासाठी ७८ चेंडूत २१ धावा करायच्या आहेत.

MI vs DC Live Score: दिल्लीला पहिला धक्का 

दिल्ली कॅपिटल्सला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. हिली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर शेफाली वर्मा यष्टिचित झाली. तिने १५ चेंडूत ३३ धावा केल्या. शेफालीने सहा चौकार आणि १ षटकार मारला. दिल्लीने पाच षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ५९ धावा केल्या आहेत. मेग लॅनिंग २३ आणि अॅलिस कॅप्सी एका धावेवर खेळत आहेत.

MI vs DC Live Score: दिल्लीची वादळी सुरुवात

११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची वेगवान सुरुवात झाली. त्यांनी तीन षटकात बिनबाद ३३ धावा केल्या आहेत. शेफाली वर्माने ९ चेंडूत १८ धावा केल्या आहेत तर कर्णधार मेग लॅनिंगने ९ चेंडूत १५ धावा केल्या आहेत.

MI vs DC Live Score: मुंबईच्या १०९ धावा

गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला कमी धावसंख्येवर रोखले. मुंबईचा संघ २० षटकांत ८ बाद १०९ धावाच करू शकला. त्यांच्याकडन पूजा वस्त्राकरने सर्वाधिक २६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २३, इस्सी वाँग २३ आणि अमनजोत कौर १९ धावा करून बाद झाल्या. 

यांशिवाय अमेलिया केरने ८, हीली मॅथ्यूजने ५ आणि यास्तिका भाटियाला एकच धाव करता आली. नतालीला सीव्हर ब्रंट खातेही उघडता आले नाही.

तर दिल्लीसाठी मारिझन कॅपने किलर गोलंदाजी केली. तिने चार षटकांत १३ धावा देत दोन बळी घेतले. शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनाही प्रत्येकी दोन विकेट्स मिळाले. अरुंधती रेड्डीने एक विकेट घेतली.

MI vs DC Live Score: मुंबईला सहावा धक्का बसला

शिखा पांडेने मुंबई इंडियन्सला सहावा धक्का दिला. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरला बाद केले. हरमनप्रीत २६ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. मुंबईने १५ षटकांत ६ बाद ७४ धावा केल्या आहेत. अमनजोत कौर आणि इस्सी वाँग क्रीजवर आहेत.

MI vs DC Live Score: मुंबईला दुसरा धक्का

मारिजन कॅपने मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तिने नताली सीव्हर ब्रंटला क्लीन बोल्ड केले. पहिल्याच चेंडूवर नताली बाद झाली. तिला खाते उघडता आले नाही. ती बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीझवर आली आहे.

MI vs DC Live Score: मुंबईला पहिला धक्का बसला

दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मारिजन कॅपने पहिले यश मिळवून दिले. तिने यास्तिका भाटियाला यष्टिरक्षक तानिया भाटियाकरवी झेलबाद केले. यास्तिकाला सहा चेंडूत केवळ एक धाव करता आली.

MI vs DC Live Score: दोन्ही संघांची प्लेइंग-११

मुंबई इंडियन्स: 

हीली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सायव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वाँग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स: 

मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजन कॅप, तान्या भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.

MI vs DC Live Score: मुंबईची प्रथम फलंदाजी 

मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करणार आहे. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही. तर मुंबईने धारा गुजरच्या जागी पूजा वस्त्राकरचा समावेश केला आहे.

WhatsApp channel