मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: ‘अशा' निर्णयांसाठीच धोनी ओळखला जातो, माहीच्या 'त्या' पोस्टनं क्रिकेटविश्व हादरलं

MS Dhoni: ‘अशा' निर्णयांसाठीच धोनी ओळखला जातो, माहीच्या 'त्या' पोस्टनं क्रिकेटविश्व हादरलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 15, 2022 11:25 AM IST

MS Dhoni Retirement: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. धोनीने २०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ४१ वर्षीय माहीने ३५० एकदिवसीय, ९८ टी-20 आंतरराष्ट्रीय आणि ९० कसोटी सामन्यांमध्ये १७ हजार २६६ धावा केल्या आहेत.

ms dhoni
ms dhoni

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीला आज (१५ ऑगस्ट) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२० मध्ये जेव्हा १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत होता, त्याच वेळी संध्याकाळी ७.२९ वाजता एक बातमी आली. ज्याने क्रिकेट विश्वाला हादरवून सोडले. ही बातमी एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची होती.

यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या या घोषणेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता. माहीच्या या निर्णयाने चाहते थक्क झाले होते. एमएस धोनीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली होती. व्हिडीओमध्ये वाजत असलेले 'मैं पल दो पल का शायर हूं...' हे गाणे आजही चाहत्यांच्या मनावर कोरले गेले आहे.

धोनीची निवृत्तीची इन्स्टाग्राम पोस्ट-

धोनीने निवृत्तीची घोषणा करताना त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. ७.२९ नंतर, मला सेवानिवृत्त मानले जावे". धोनीच्या निवृत्तीनंतर काही वेळातच सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

धोनीचं करिअर

धोनीने २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ४१ वर्षीय माहीने ३५० एकदिवसीय, ९८ टी-20 आंतरराष्ट्रीय आणि ९० कसोटी सामन्यांमध्ये मिळून १७ हजार २६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १०८ अर्धशतके आणि १६ शतके झळकावली आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन आयसीसी जेतेपदे जिंकण्यात यश आले. त्याचबरोबर त्याने सीएसकेला आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन बनवले आहे.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार

धोनी हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ६० कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये टीम इंडियाने २७ सामन्यांपैकी १८ सामने जिंकले. त्याचवेळी १५ सामने अनिर्णित राहिले. एमएस धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. धोनीने २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यात संघाने ११० सामने जिंकले. याशिवाय ११ सामने अनिर्णित राहिले आणि ५ सामने टाय झाले.

T20 आंतरराष्ट्रीय बद्दल बोलायचे तर, एमएस धोनी या फॉरमॅटमध्ये देखील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एमएस धोनीने ७२ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये भारताने ४२ सामने जिंकले. त्याच वेळी, २८ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि दोन सामन्यांचे निकाल लागले नाहीत ते अनिर्णित राहिले.

 

WhatsApp channel