मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: ब्रेक अप निश्चित! IPL 2022 पासूनच जड्डू - CSK यांच्यात संवाद नाही

Ravindra Jadeja: ब्रेक अप निश्चित! IPL 2022 पासूनच जड्डू - CSK यांच्यात संवाद नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 15, 2022 05:50 PM IST

Ravindra Jadeja & CSK: जडेजा २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला होता. १० वर्षांत त्याने संघासह दोन विजेतेपदे जिंकली. यावर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जडेजाला पुढचा कर्णधार बनवण्यात आले.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ते वेगळे होऊ शकतात. जडेजा मे महिन्यात आयपीएल संपल्यापासून CSK मॅनेजमेंटच्या संपर्कात नाही.

 चेन्नई फ्रेंचायझी खेळाडूंना एका कुटुंबाप्रमाणे ठेवते आणि वर्षभर त्यांच्या संपर्कात राहते, परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅब प्रक्रियेत गुंतलेल्या जडेजाने फ्रँचायझीपासून अंतर ठेवले आहे. तो CSK च्या कोणत्याही मोहिमेत सहभागी होत नाहीये.

आयपीएल २०२२ (IPL) सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी खराब झाली. त्यामुळे अर्ध्या आयपीएलमध्येच जडेजाकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि पुन्हा धोनीला कर्णधार बनवण्यात आले. या गोष्टीला जडेजाने स्वता:चा अपमान समजला आणि संघासोबतचा संपर्क तोडून टाकला. त्यानंतर जडेजाने दुखापतीचे कारण देत उरलेले सीझन खेळले नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्जबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले.

CSK च्या पोस्ट डिलीट, धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत

जेव्हा जडेजाने मुंबईतील सीएसकेचा संघ थांबलेले हॉटेल सोडले तेव्हापासून फ्रेंचायझी त्याच्याशी असलेले मतभेद दूर करु शकलेली नाही. त्यानंतर जडेजाने सोशल मीडियावरील सीएसके संदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्याने महेंद्रसिह धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नव्हत्या.

३७ दिवसांतच जडेजाला कर्णधारपद सोडावे लागले 

जडेजा २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला होता. १० वर्षांत त्याने संघासह दोन विजेतेपदे जिंकली. यावर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जडेजाला पुढचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, ३७ दिवसांनी त्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीला पुन्हा संघाची कमान सांभाळावी लागली.

जडेजा दबाव झेलू शकला नाही

यावेळी चेन्नईने आयपीएल लिलावापूर्वी धोनी-जडेजासह ४ खेळाडूंना रिटेन केले होते. जडेजाला फ्रँचायझीने सर्वाधिक १६ कोटी रुपये देऊन रिटेन केले . मात्र या मोसमासाठी धोनीला केवळ १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आले होते. तेव्हापासून जडेजाला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर जडेजा कर्णधार झालाही, पण दबाव हाताळण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही.

 

WhatsApp channel