ravindra jadeja gift winning bat to ajay mondal : आयपीएल 2023 चा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या (ms dhoni) तृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा (GT) ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
चेन्नईच्या या विजयाचा हिरो डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा ठरला. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर आता जडेजाने ज्या बॅटने चौकार मारून संंघाला चॅम्पियन बनवले, ती बॅट एका व्यक्तीला भेट दिली आहे. जडेजाने ती बॅट सीएसकेचा सहकारी अजय मंडलला (ravindra jadeja gift bat to ajay mondal)गिफ्ट दिली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळणाऱ्या अजय मंडलला (who is ajay mondal) सीएसकेने आपल्या संघात खरेदी केले. मात्र, त्याला फ्रँचायझीकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकली नाही. अजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जडेजाने भेट दिलेल्या करिष्माई बॅटचा फोटो शेअर केला आहे.
अजयने बॅटच्या फोटोसोबत लिहिले की, मला आशा आहे की तुम्हाला आठवत असेल. सर जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत १० धावा करून संघाला कसे चॅम्पियन बनवले. त्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद म्हणून ही बॅट दिली. मला ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्जचे खूप खूप आभार. अजय मंडलची ही इंस्टाग्राम स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होत असून रवींद्र जडेजाचेही कौतुक होत आहे.
अजय मंडल हा डावखुरा फलंदाज असून तो छत्तीसगडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. फलंदाजीसोबतच अजय पार्ट टाईम फिरकी गोलंदाजीही करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजयला २९ प्रथम श्रेणी, २३ लिस्ट ए आणि ३४ टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. अजयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३२० धावा केल्या आहेत, तर लिस्ट A मध्ये ३७५ धावा आणि T20 मध्ये २४६ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने प्रथम श्रेणीत १०३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने लिस्ट ए मध्ये २५ विकेट घेतल्या आहेत तर टी-20 क्रिकेटमध्ये २८ विकेट्स घेतल्या आहेत.
CSK ने IPL 2023 चा अंतिम सामना 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र, पावसामुळे सीएसकेला १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात रवींद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला विजय मिळवून. अशाप्रकारे CSK पाचव्यांदा चॅम्पियन ठरला.