मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022! पंजाब विरूद्ध मॅच हरल्यावर काय म्हणाला रविंद्र जाडेजा

IPL 2022! पंजाब विरूद्ध मॅच हरल्यावर काय म्हणाला रविंद्र जाडेजा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 26, 2022 10:42 AM IST

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई आणि चेन्न्ई या दोन्ही संघांची दशा आणि दिशा एकसारखीच राहिली आहे.

रविंद्र जाडेजा आणि महेंद्र सिंह धोनी
रविंद्र जाडेजा आणि महेंद्र सिंह धोनी (हिंदुस्तान टाइम्स)

चेन्न्ई सुपर किंग्ज या संघाला लौकीकाला जागणारा संघ म्हणून पाहिलं जात होतं. मात्र १५ व्या मोसमात नव्या कप्तानासह संघ उतरला होता तो मात्र आणखी एक विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पण यंदाच्या मोसमात या संघाला काय झालं कुणास ठावूक. विजेतेपद अद्याप दूर आहे पण हा संघ प्ले ऑफमध्येही प्रवेश करेल की नाही या बाबत शंकाच आहे. सोमवारी झालेल्या पंजाब किंग्ज या संघाविरुद्ध ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहाजिकच संघाचा नवनिर्वाचित कर्णधार रविंद्र जाडेजा निराश झालाय. क्षेत्ररक्षणात १०-१५ धावा जास्त दिल्याचं तो कारण पुढे करतोय. 

सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकला आणि पंजाबला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पहिल्या काही षटकात चाचपडत खेळणाऱ्या शिखर धननने एकदा जम बसल्यावर मात्र मनमुराद फटकेबाजी केली. शिखर धवन शकत पूर्ण करणार असं वाटत असताना गब्बर ८८ धावांवर बाद झाला. मात्र धवनला भानुका राजपक्षेनं ४२ धावा आणि लियम लिविंगस्टोनने ७ चेंडूत १९ धावा करुन मोलाची साथ दिली आणि पंजाबने २० षटकात १८७ धावा केल्या.

१८८ धावांचं टार्गेट घेऊन उतरलेल्या चेन्नईनं अंबाती रायडूने ३९ चेंडूत ७८ धावांच्या मदतीनं जेमतेम १७६ धावांचा टप्पा गाठला आणि पराभव पत्करला.

पराभवानंतर निराश झालेल्या रविंद्र जाडेजाने आम्ही १०-१५ धावा जास्त दिल्या असं सांगितलं.आम्ही पहिल्या सहा षटकात चांगलं काम करु शकलो नाही असं जाडेजा म्हणाला. आम्ही पहिल्या ६ षटकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरत आहोत असंही जाडेजा म्हणालाय. मात्र आम्ही मजबुतीनं या सीझनमध्ये पुनरागमन करु असंही जाडेजाचं म्हणणं आहे.

आयपीएलच्या लीगमधल्या परतीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. अशात प्रत्येक संघ टॉप चारमध्ये यायला पूर्ण प्रयत्न करतोय. आता जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल तोच या टॉप चारमध्ये अर्थात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा आहे. मात्र सध्याचा चेन्नईचा फॉर्म पाहाता त्यांच्यासाठी प्ले ऑफमध्ये प्रवेश दिवास्वप्न वाटत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग