मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL2022 : राजस्थानची प्लेऑफमध्ये एन्ट्री, लखनऊला बसला धक्का

IPL2022 : राजस्थानची प्लेऑफमध्ये एन्ट्री, लखनऊला बसला धक्का

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 07:43 AM IST

लखनऊने आधीच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं असलं तरी राजस्थानच्या विजयाने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स (फोटो - पीटीआय)

ेजदीराजस्थान रॉयल्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जविरोधात ५ गडी राखून विजय मिळवला. यासह राजस्थानने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं. गुजरात आणि लखनौ नंतर राजस्थान प्लेऑफसाठी पात्र ठरलेला तिसरा संघ बनला आहे. आता फक्त एका संघाची जागा शिल्लक असून यासाठी दोन संघ स्पर्धेत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीला प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. राजस्थान रॉयल्सच्या विजयाने लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या स्थानी पोहोचले आहे.

राजस्थान रॉयल्सच्या विजयाच्या आधी लखनऊचा संघ टॉप २ मध्ये होता. मात्र आता तो तिसऱ्या स्थानी घसरल्यानं त्यांची मोठी संधी हुकली आहे. टॉप २ संघांना अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी २ संधी मिळतात. आता तिसऱ्या स्थानी घसरल्यानं लखनऊची ती संधी गेली आहे.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात प्लेऑफमधील पहिला सामना होणार आहे. २४ मे रोजी होणाऱ्या या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला एलिमिनेटर म्हणून एक सामना खेळण्याची संधी मिळेल. हा सामना २५ मे रोजी होईल. लखनऊ तिसऱ्या स्थानावर असल्याने ते थेट एलिमिनेटर सामना खेळतील.

आरसीबी त्यांचा अखेरचा सामना जिंकून १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली १४ गुणांसह पाचव्या स्थानी. आता त्यांचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे. दिल्लीने विजय मिळवला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील आणि जर मुंबई जिंकली तर आरसीबीची प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. त्यामुळे या सामन्याकडे आरसीबीचे लक्ष लागून राहिले आहे.

WhatsApp channel

विभाग