मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INDvsENG: इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

INDvsENG: इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

27 June 2022, 21:56 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 21:56 IST
  • टीम इंडिया सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला (team india) एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. यापूर्वी आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा आढावा घेणार आहोत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. इंग्लंडमध्ये सचिनने १७ कसोटीत त्याने एकूण १५७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ५४.३१ इतकी आहे. त्याने येथे इंग्लंडविरुद्ध ४ शतके आणि ८ अर्धशतके केली आहेत.

(1 / 5)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. इंग्लंडमध्ये सचिनने १७ कसोटीत त्याने एकूण १५७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ५४.३१ इतकी आहे. त्याने येथे इंग्लंडविरुद्ध ४ शतके आणि ८ अर्धशतके केली आहेत.(sachin tendulkar, instagram)

टीम इंडियाचे सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या १३ कसोटी सामन्यांमध्ये ६८.८० च्या सरासरीने १३७६ धावा केल्या आहेत. द्रविडने येथे इंग्लंडविरुद्ध ६ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत.

(2 / 5)

टीम इंडियाचे सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या १३ कसोटी सामन्यांमध्ये ६८.८० च्या सरासरीने १३७६ धावा केल्या आहेत. द्रविडने येथे इंग्लंडविरुद्ध ६ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत.(hindustan times)

माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर हे इंग्लंडमध्ये इंग्लिश संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे तिसरे भारतीय फलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ११५२ धावा केल्या आहेत. यात त्यांनी ४ शतके ठोकली आहेत. यादरम्यान गावस्कर यांची सरासरी ४१.१४ इतकी राहिली आहे.

(3 / 5)

माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर हे इंग्लंडमध्ये इंग्लिश संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे तिसरे भारतीय फलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ११५२ धावा केल्या आहेत. यात त्यांनी ४ शतके ठोकली आहेत. यादरम्यान गावस्कर यांची सरासरी ४१.१४ इतकी राहिली आहे.(instagram, sunil gavaskar)

या यादीत दिलीप वेंगसरकर चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये १३ कसोटी सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने ९६० धावा केल्या आहेत. वेंगसरकरांनीही येथे ४ शतके झळकावली आहेत.

(4 / 5)

या यादीत दिलीप वेंगसरकर चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये १३ कसोटी सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने ९६० धावा केल्या आहेत. वेंगसरकरांनीही येथे ४ शतके झळकावली आहेत.(social media)

या यादीतील टॉप-5 मध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. त्याच्या नावावर इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ९४५ धावा आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी ३५ इतकी आहे.

(5 / 5)

या यादीतील टॉप-5 मध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. त्याच्या नावावर इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ९४५ धावा आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी ३५ इतकी आहे.(instagram, virat kohli)

इतर गॅलरीज