मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टीम इंडियाला मोठा धक्का! आर. अश्विन कोरोना पॉझिटिव्ह, इंग्लंड दौऱ्याला मुकणार?
r ashwin
r ashwin
21 June 2022, 13:59 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 June 2022, 13:59 IST
  • टीम इंडिया (taem india) २४ जूनपासून काऊंटी टीम लीसेस्टरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे पाचव्या कसोटीसाठी तो आपल्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही. 'अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे, तसेच सर्व प्रोटोकॉल व्यवस्थित पूर्ण केल्यानंतरच तो संघात सामील होईल', अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, "अश्विन संघासोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही. कारण रवाना होण्यापूर्वी त्याने कोविड-१९ चाचणी केली होती, ज्यामध्ये त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. पण १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो बरा होईल, अशी आम्हाला आशा आहे".

टीम इंडियाचे सर्व खेळाडू १६ जून रोजी लंडनला पोहोचले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे १८ जून रोजी लंडनमध्ये दाखल झाले. आता हे सर्व खेळाडू लेस्टरला पोहोचले आहेत. येथे टीम इंडिया २४ जूनपासून काऊंटी टीम लीसेस्टरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक-

कसोटी मालिका

५ वा कसोटी सामना: एजबॅस्टन- १-५ जुलै (दुपारी ३:३० वाजेपासून)

टी-२० मालिका

पहिला टी-२०: ७ जुलै (एजेस बाउल) (रात्री ११ वाजता)

दुसरा टी-२०: ९ जुलै (एजबॅस्टन) (सायंकाळी ७ वाजता)

तिसरा टी-२०: १० जुलै ( ट्रेंट ब्रिज) (रात्री ११ वाजता)

एकदिवसीय मालिका

पहिला वन-डे: १२ जुलै (ओव्हल) (दुपारी ३:३० वाजेपासून)

दुसरा वन-डे: १४ जुलै (लॉर्ड्स) (दुपारी ३:३० वाजेपासून)

तिसरा वन-डे: १७ जुलै (मँचेस्टर) (दुपारी ३:३० वाजेपासून)