Rohit Sharma : हिटमॅन बनला गजनी! टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा हे रोहित शर्मा विसरला
rohit sharma toss, IND VS NZ 2nd ODI भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा निर्णय का घ्यायचा हे विसरला, तो थोडा वेळ विचार करत राहिला. यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला असे करताना पाहून न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि सामनाधिकारीही आश्चर्यचकित झाले.
IND VS NZ 2nd ODI : सध्या भारत-न्यूझीलंड वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. तर आज शनिवारी ( २१ जानेवारी) दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जात आहे. मात्र, या भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला एक विचित्र प्रसंग घडला. या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
ट्रेंडिंग न्यूज
वास्तविक रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पण यानंतर निर्णय काय घ्यायचा आहे हे तो विसरला. रवी शास्त्रींनी काय घेणार असे विचारतचा रोहित गोंधळेला दिसला. रोहित थोडा वेळ विचार करत राहिला. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ रोहितच्या उत्तराची वाट पाहत होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर त्याने सांगितले की, मॅचपूर्वी खूप चर्चा होत आहे. अशा स्थितीत तो आपला निर्णय काही काळ विसरला, पण त्याला आधी गोलंदाजी करायची आहे. मात्र, नाणेफेकीनंतर निर्णय घेण्यास रोहितला इतका उशीर झाला की समालोचक रवी शास्त्री, सामनाधिकारी जवागल श्रीनाथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम यांनाही आश्चर्य वाटले की, रोहितला नेमके काय झाले?
हा क्षण खूप मजेशीर होता. यादरम्यान टॉम लॅथम, जवागल आणि रवी शास्त्री हे तिघेही हसायला लागले. आपला निर्णय सांगतानाही रोहित दोन-तीन वेळा अडकला. पण नंतर तो म्हणाला की आम्हाला आधी गोलंदाजी करायची आहे.
दोन्ही संघ
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन.