मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 1st T20 : रांचीच्या खेळपट्टीवर चालते फिरकीची जादू, असं असेल हवामान

IND vs NZ 1st T20 : रांचीच्या खेळपट्टीवर चालते फिरकीची जादू, असं असेल हवामान

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 12:13 PM IST

ind vs nz 1st t20 pitch and weather report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज २७ जानेवारीपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे.

IND vs NZ 1st T20
IND vs NZ 1st T20

India vs New Zealand 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील T20 मालिकेला आज (२७ जानेवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने याआधीच न्यूझीलंडचा वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. तसेच, न्यूझीलंडचा संघ गेल्या ११ वर्षांपासून भारतात टी-20 मालिका जिंकू शकलेला नाही. अशा स्थितीत किवींविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा दबदबा कायम राहणार, अशी शक्यता आहे.

रांचीचे हवामान कसं असेल?

भारत आणि न्यूझीलंड टी-20 सामन्याच्या दिवशी रांचीचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी येथे दिवसाचे तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी त्यात घट होऊन तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. रांचीमध्ये दिवसभर आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. असे हवामान खात्याने म्हटले आहे.

पीच रिपोर्ट

रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा थोडे वेगळे आहे. हे एक मोठे मैदान आहे जिथे फिरकीपटूंच्या यशाचा इतिहास आहे. रांचीच्या पीचवर संथ आणि फिरकी गोलंदाजांना अधिक फायदा मिळतो.  यापूर्वी रांचीमध्ये ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. रांचीमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत:

शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, इश सोढी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी.

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20 - २७ जानेवारी, रांची

दुसरा T20 - २७ जानेवारी, लखनौ

तिसरा T20 - १ फेब्रुवारी, अहमदाबाद

WhatsApp channel