मराठी बातम्या  /  क्रीडा  /  हे वागणं बरं नव्हं! युट्युब चॅनलची हेडलाईन पाहा, दिनेश कार्तिक ECB वर भडकला

हे वागणं बरं नव्हं! युट्युब चॅनलची हेडलाईन पाहा, दिनेश कार्तिक ECB वर भडकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 06:43 PM IST

सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीच्या दोन तासात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगलाच दबदबा निर्माण केला होता. टीम इंडियाने १०० धावांच्या आतच आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या.

dinesh karthik
dinesh karthik

भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिषभ पंतने सामन्याच्या पहिल्याच दिवशी १४६ धावांची शानदार खेळी खेळली. ही खेळी सध्याच्या काळातील सर्वोत्तम कसोटी डावांपैकी एक आहे. पंतच्या या दमदार कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत, पण इंग्लंड क्रिकेटने पंतचे कौतुक करण्याचा दिलदारपणा दाखवला नाही. या कारणावरुन टीम इंडियाचा फलंदाज दिनेश कार्तिक चांगलाच नाराज झाला आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंड क्रिकेटने दिवसभराचे हायलाईट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहे. मात्र, या व्हिडीओची हेडलाईन दिेनेश कार्तिकला आवडली नाही. यावरुन तो ECB वर चांगलाच संतापला आहे. या व्हिडीओची हेडलाईन ही "जो रूटने रिषभ पंतची विकेट घेतली", अशी आहे. ही हेडलाईन कार्तिकला रुचली नाही. त्याने याबाबत ECB ला जाब विचारला आहे.

कार्तिकने ट्वीट करून हा मुद्दा उपस्थित केला आहे. कार्तिकने लिहिले की, "आजच्या इतक्या छान आणि मनोरंजक खेळानंतर, मला वाटते की हेडलाइन यापेक्षा चांगली असू शकली असती. रिषभ पंतची ही खेळी कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट इनिंगपैकी एक आहे, तुम्ही चांगली हेडलाईन करु शकला असता".

दरम्यान, फक्त दिनेश कार्तिकच नाही तर अनेक क्रिकेट चाहत्यांनीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या वृत्तीवर टीका केली आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीच्या दोन तासात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगलाच दबदबा निर्माण केला होता. टीम इंडियाने १०० धावांच्या आतच आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर भारताच्या रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांनी शानदार भागीदारी केली. या दोघांनी मिळून ६ व्या विकेटसाठी विक्रमी २२२ धावा जोडल्या. रिषभ पंतने पहिल्याच दिवशी १४६ धावा केल्या होत्या, नंतर रवींद्र जडेजानेही १०४ धावांचे योगदान दिले.

भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा-

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे. भारताकडून रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांंनी शतके ठोकली आहेत. दोघांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी २२२ धावांची भागिदारी रचली. भारतीय संघ अडचणीत असताना दोघांनी जबाबदारीने खेळ केला. पंतने १४६ धावा तर जडेजाने १०४ धावा केल्या. शेवटी जसप्रीत बुमराने १६ चेंडूत ३१ धावा चोपल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले.

WhatsApp channel