मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर फायदा कोणाचा? जाणून घ्या

IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर फायदा कोणाचा? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 28, 2023 03:04 PM IST

CSK vs GT Weather Forecast : IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात आणि चेन्नईचे संघ आमनेसामने असतील. रिपोर्टनुसार या (CSK vs GT Weather Forecast) सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

IPL 2023 Final CSK vs GT
IPL 2023 Final CSK vs GT

CSK vs GT, Indian Premier League Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळवला जाणार आहे. या आयपीएल मोसमाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्यानेच झाली होती. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ आज अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

पण आयपीएल फायनलच्या दिवशी (Ahmedabad Weather Forecast) पावसाचा व्यत्यय येईल का? अशी चिंता चाहत्यांना सतावत आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेतेपदाचा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी समारोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. या समारोप सोहळ्यात अनेक मोठे स्टार्स आपली कला सादर करणार आहेत. IPL 2023 चा समारोप समारंभ संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.

पावसाची शक्यता

दरम्यान, MI आणि GT मधील क्वालिफायर 2 सामन्याला पावसामुळे ४५ मिनिटे (नाणेफेक) उशीर झाला होता. AccuWeather' च्या रिपोर्टनुसार , IPL 2023 च्या अंतिम सामन्याच्या दिवशी म्हणजेच आज रविवारी (२८ मे) पावसाची ४० टक्के शक्यता आहे. आज अहमदाबादमध्ये २ तास पाऊस पडू शकतो. संध्याकाळी पावसाचा धोका वाढेल. सूर्यास्त होताच हलक्या पावसाची शक्यता बळावली आहे.

जोरदार वारे वाहू शकतात

सोबतच ताशी ५० किमी वेगाने वारा वाहू शकतो. याशिवाय, हवामान खात्याने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, आज संध्याकाळी फारसा पाऊस पडणार नाही, परंतु काळे ढग येऊ शकतात. आता चाहत्यांना संपूर्ण सामना बघायला मिळतो की पावसामुळे सामन्यात अडथळा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

फलंदाजांना होऊ शकतो फायदा

अहमदाबादमध्‍ये ढगाळ वातावरण असल्‍याने सुरुवातीला चेंडूला थोडीशी उसळी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर -2 सामन्याप्रमाणे खेळ जसजसा पुढे सरकत जाईल तसतसा फलंदाजीसाठी परिस्थिती अधिक चांगली होईल.

WhatsApp channel