मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya : माझा एकच साधा सरळ नियम... हार्दिकनं सांगून टाकलं कर्णधारपदाच्या यशाचं रहस्य

Hardik Pandya : माझा एकच साधा सरळ नियम... हार्दिकनं सांगून टाकलं कर्णधारपदाच्या यशाचं रहस्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 02, 2023 11:03 AM IST

Hardik Pandya India vs new Zealand : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने १६८ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा भारताचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे.

Hardik Pandya
Hardik Pandya

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत दणदणीत विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात शुभमन गिलने १२६ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

तर भारतीय संघासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्यात १६ धावांत ४ बळी घेतले आणि संपूर्ण किवी संघाला ६६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात पंड्याने १७ चेंडूत ३० धावांची खेळीही खेळली. त्यामुळेच पांड्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

भारतीय संघाने तिसरा सामना १६८ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. सामन्यानंतर कर्णधार पंड्या म्हणाला की, त्याला स्वत:च्या अटींवर सामने खेळायला आवडतात. या निर्णयांमुळे नुकसान झाले तरी त्याला पश्चाताप होत नाही.

मॅन ऑफ द सिरीज सपोर्ट स्टाफला समर्पित

विशेष म्हणजे, पंड्याने विजयी ट्रॉफी आणि प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला समर्पित केली.

हार्दिक पांड्या म्हणाला की, 'हा (प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार) जिंकणे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, पण इथे बरेच लोक होते, ज्यांची कामगिरी असाधारण होती. मी या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू आणि ट्रॉफी सर्व सपोर्ट स्टाफला समर्पित करतो. या सर्वांसाठी मी खूप आनंदी आहे.

सोबतच, पंड्या म्हणाला की, 'खरं सांगायचं तर मी नेहमीच असाच खेळलो आहे. मी काय आवश्यक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी आधीच माझे मन बनवत नाही. माझ्या कर्णधारपदात मला गोष्टी साध्या ठेवायच्या आहेत. माझा साधा नियम आहे जर मी खाली गेलो तर ते माझ्या स्वतःच्या अटींवर जाईल. आम्ही यापूर्वीही अनेक आव्हाने स्वीकारली आहेत".

WhatsApp channel

संबंधित बातम्या