मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shoaib Akhtar Birthday: वकारशी भांडण ते आसीफला मारहाण! वाचा, 'बॅड बॉय' शोएबचे खतरनाक किस्से
Shoaib Akhtar
Shoaib Akhtar

Shoaib Akhtar Birthday: वकारशी भांडण ते आसीफला मारहाण! वाचा, 'बॅड बॉय' शोएबचे खतरनाक किस्से

13 August 2022, 17:20 ISTRohit Bibhishan Jetnavare

Shoaib Akhtar Birthday Special: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा आज वाढदिवस आहे. शोएबच्या आयुष्यात असे अनेक वाद निर्माण झाले आहेत. जे वाचून कोणीही त्याला 'क्रिकेटमधला बॅड बॉय' म्हणेल.

शोएब अख्तर आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. एका लहानशा गावात जन्मलेल्या शोएबचा रावळपिंडी एक्सप्रेस बनण्याचा प्रवास सोपा नव्हता. शोएबचा १९७५ मध्ये जन्म आजच्याच दिवशी रावळपिंडीमधील मोरगाह या खेडेगावात झाला. त्याचे वडील वॉचमन होते. शोएबला लहानपणापासूनच क्रिकेटर बनायची इच्छा होती. ती इच्छाच त्याला जिथे पोहोचायचे होते त्याच्या शिखरावर घेऊन गेली. शोएबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६१.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. हा आजही एक विक्रम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला शोएब २००० च्या दशकातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जात होता. त्याच्या गोलंदाजीच्या वेगासमोर अनेक फलंदाज हतबल व्हायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही शोएबच्या नावावर आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४ टी-20, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले आहेत. त्‍याच्‍या नावावर टी-20 मध्‍ये २१, एकदिवसीयमध्‍ये २४७ विकेट आणि कसोटीमध्‍ये १७८ विकेट्स आहे

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

शोएबचे करिअर हे कॉन्ट्रोवर्शियल राहिले आहे. अनेकदा वादविवादांमध्ये त्याचे नाव आले आहे. म्हणूनच त्याला अनेकवेळा क्रिकेटचा 'बॅड बॉय' म्हटले गेले आहे.

कर्णधार वकार युनुसशी भांडण

२००३ च्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर शोएब संघाचा कर्णधार वकार युनूस याच्याशी भिडला. त्याने सर्वांसमोर युनूसला अतिशय वाईट पद्धतीने भांडला होता. यासाठी त्याला शिक्षाही झाली होती. त्याच्या पुढच्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू पॉल अॅडम्सलाही शिवीगाळ करत अपशब्द वापरले होते. त्यासाठी त्याला एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले. याशिवाय २००५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाईट कर्फ्यू मोडल्याबद्दलही त्याला शिक्षा झाली होती.

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

बॉल टेम्परिंग

शोएब अख्तर केवळ मैदानाबाहेरच नाही तर मैदानावरही अनेकदा वादात सापडला आहे. २००३ मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या ट्राईंगूलर सीरीजदरम्यान शोएब अख्तर बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला होता. त्याने मैदानावर बॉलसोबत छेडछाड केली होती. यासाठी त्याच्यावर बंदीही घालण्यात आली. बॉल टॅम्परिंग प्रकरणात बंदीला सामोरे जावे लागलेला तो त्यावेळी जगातील दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला होता.

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

ड्रग्ज घेतल्याबद्दल दोषी

२००६ मध्ये शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ अंमली पदार्थ सेवनात दोषी आढळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना निलंबित केले होते. कार्यक्षमता वाढवणारे उत्तेजक औषध नॅंड्रोलोन घेतल्याबद्दल तो दोषी आढळला होता. या दोन्ही खेळाडूंना २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर शोएब हा बऱ्याच काळापासून ड्रग्सचे सेवन करत असल्याचा खुलासा तत्कालीन कर्णधार इंझमाम उल हक आणि संघ मॅनेजमेंटच्या आधिकाऱ्यांनी केला होता. यासाठी शोएब अख्तरला दोन वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागले होते.

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

मोहम्मद आसिफला मारहाण

ज्या मोहम्मद आसिफसोबत तो अंमली पदार्थांच्या सेवनात दोषी आढळला होता. त्याच मोहम्मद आसिफला बॅटने मारल्याबद्दलही शोएब दोषी आढळला होता. हे प्रकरण २००७ च्या T20 विश्वचषकामधील आहे. जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये शाहिद आफ्रिदीसोबत सुरु असलेल्या संभाषणात आसिफ मध्येच काहीतरी बोलला. त्यानंतर शोएब अख्तर इतका चिडला की त्याने असिफवर बॅटने हल्ला केला. चौकशीअंती अख्तर दोषी आढळला आणि त्याला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. त्याच्यावर ५ सामन्यांची बंदीही घालण्यात आली होती. नंतर त्याने या प्रकरणातील सर्व दोष शाहिद आफ्रिदीवर टाकला होता.

Shoaib Akhtar

Shoaib Akhtar

विमनातळावर हुल्लडबाजी

करिअरच्या या टप्प्यावर येईपर्यंत शोएब हा नियम मोडणे आणि स्वताच्या मर्जीने वाटेल त्या गोष्टी करण्यासाठी ओळखला जाऊ लागला होता. याचाच एक नमुना २००८ मध्ये जेव्हा तो काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला तेव्हा समोर आला होता. तो काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी वर्किंग व्हिसा ऐवजी व्हिजिट व्हिसा घेऊन पोहोचला होता. यामुळे त्याला विमानतळावरुनच पाकिस्तानला परत पाठवण्यात आले. शोएबला याची कल्पना असूनही त्याने निष्काळजीपणा केला. आणि केवळ चान्स घेण्याच्या उद्देशाने त्याने हे पाऊल उचलले. इंग्रजांना आपण चकमा देऊ असे त्याला वाटले, पण तसे झाले नाही. शोएब अख्तरने स्वता हा खुलासा केला होता.