मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: रजिया गुंडो में फस गयी... तगड्या संघांमध्ये अफगाण टीम अडकली; वाचा, ग्रुप ऑफ डेथ'बद्दल

T20 World Cup: रजिया गुंडो में फस गयी... तगड्या संघांमध्ये अफगाण टीम अडकली; वाचा, ग्रुप ऑफ डेथ'बद्दल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 01:17 PM IST

Group of Death T20 World Cup 2022: T20 विश्वचषक १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधी क्वालिफायर सामने खेळवले जातील. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ चे सामने सुरु होतील. तसेच १६ संघ ४ गटात विभागले गेले आहेत, त्यापैकी गट-१ ला 'डेथ ऑफ ग्रुप' असे संबोधले जात आहे. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा गट १ मध्ये समावेश आहे.

T20 World Cup 2022
T20 World Cup 2022

अवघ्या दोन आठवड्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात १६ ऑक्टोबरपासून पात्रता फेरीने होणार आहे, तर सुपर-१२ फेरीतील सामने २२ ऑक्टोबरपासून खेळवले जातील.

यावेळी विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. यातील ८ संघ थेट सुपर-१२ साठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करतील. सर्व १६ संघ ४ गटात विभागले गेले आहेत, त्यापैकी गट-१ ला 'डेथ ऑफ ग्रुप' म्हटले जात आहे.

ग्रुप-१ ​​हा 'डेथ ऑफ ग्रुप' मानला जात आहे

याचे कारण म्हणजे ग्रुप-१ मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघांचा समावेश आहे. तर या तिघांमध्ये चौथा संघ अफगाणिस्तानचा आहे. सुपर-१२ च्या या गटात पात्रता फेरीनंतर अजून दोन संघ सामील होतील.

२००७ पासून सुरु झालेल्या T20 वर्ल्ड कप चा हा ८ वा सीझन आहे. भारतीय संघाने पहिले सीझन आपल्या नावावर केले होते. आतापर्यंत, दोनदा (२०१२, २०१६) विजेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे. याशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने १-१ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपदाचा दावेदार

<p>australia cricket team</p>
australia cricket team

२०२१ मध्ये यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाने विजेतेपद पटकावले होते. न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पराभूत झाला होता. यावेळी दोन्ही संघ एकाच गटात आहेत. ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

अलीकडेच भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव झाला आहे. पण याआधी कांगारू संघाने सलग ३ सीरीज जिंकल्या आहेत. यात श्रीलंका (२ मालिका) आणि पाकिस्तानला एका मालिकेत पराभूत केले आहे. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श दुखापतीमुळे बाहेर होते. मात्र हे सर्वजण वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहेत.

न्यूझीलंडचा संघ यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये

<p>new zealand cricket team</p>
new zealand cricket team

न्यूझीलंडचा संघ यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. यावर्षी किवी संघाने एकही द्विपक्षीय टी-२० मालिका गमावलेली नाही. न्यूझीलंड संघाने यंदाच्या चारही मालिका जिंकल्या आहेत. मात्र, किवी संघाने या काळात कमकुवत आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. पण शेवटी विजय हा विजय असतो.

आयसीसी टी-20 क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडने आतापर्यंत एकही विश्वचषक जेतेपद पटकावलेले नाही. पण या संघात कधीही बाजी पलटवण्याची क्षमता आहे. २०१९ एकदिवसीय आणि २०२१ टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी हा संघ विजेतेपद पटकावण्याच्या ठाम इराद्याने उतरणार आहे.

इंग्लंडचा संघही मजबूत स्थितीत

<p>england cricket team</p>
england cricket team

इंग्लंड संघाकडे अप्रतिम गोलंदाजांची फौज आहे. यामध्ये आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टोपली, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांचा समावेश आहे. तसेच, इंग्लंडचा संघ टी-२० स्पेशलिस्ट फलंदाजांनीदेखील भरलेला आहे.

अफगाणिस्तानमध्ये वरील तिन्ही संघांना हरवण्याची क्षमता

<p>afghanistan cricket team</p>
afghanistan cricket team

यावेळी अफगाणिस्तान संघाने विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये थेट स्थान मिळवले आहे. परंतु ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तगड्या संघांच्या गटात त्यांचा समावेश आहे. मात्र या तिन्ही संघांना अफगाणिस्तानबाबत अत्यंत सावध राहावे लागणार आहे, कारण अफगाणिस्तान संघात असे खेळाडू आहेत, जे केव्हाही बाजी पलटवण्याची क्षमता ठेवतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या