मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India Vs Australia : कोहलीला ओपनिंगला पाठवण्यावरून गंभीर भडकला, म्हणाला...

India Vs Australia : कोहलीला ओपनिंगला पाठवण्यावरून गंभीर भडकला, म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2022 02:51 PM IST

India Vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन T20 सामन्यांच्या मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

Gautam Gambhir On Virat Kohli
Gautam Gambhir On Virat Kohli (HT)

India vs australia series 2022 schedule : आशिया कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिलेली असली तरी विराट कोहली फॉर्मात परतला आहे. त्यामुळं आता T20 विश्वचषकाआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात प्रत्येकी तीन T20 सामने खेळणार आहे. परवा म्हणजे २० सप्टेंबरला मोहालीत ऑस्ट्रेलियन संघ टिम इंडियासोबत भिडणार आहे. परंतु आता सलामीवीर केएल राहुलचा फॉर्म नसल्यानंही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता माजी फलंदाज गौतम गंभीरनं केएल राहुलबाबत मोठं विधान करत कोहलीवर टोला लगावला आहे.

आता कोहलीला सलामीला पाठवलं जात असेल तर केएल राहुलचं काय होणार?, त्याला किती असुरक्षित वाटत असेल?, जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं पहिल्या सामन्यात धावा केल्या नाही तर कोहलीला सलामीला पाठवण्याबाबत चर्चा होईल. तुम्ही केएल राहुलसारख्या टॉप क्लास प्लेयरला त्या सलामीला येण्याचा स्थिती पाहू शकत नाही, कारण त्याच्यात कोहली आणि रोहितपेक्षा अधिक क्षमता आहे. त्यामुळं त्याच्या कठीण काळात त्याला साथ द्यायला हवी, असं गंभीर म्हणाला.

केएल राहुलच्या फॉर्मबाबत बोलताना गंभीर म्हणाला की, मागच्या काही वर्षात केएल राहुलनं खेळलेल्या अनेक खेळींना विसरून चालणार नाही. आता विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकलं तर रोहितनं मागच्या दोन वर्षात केलेली मेहनत लोक विसरून गेले, असं म्हणत त्यानं कोहलीला टोला लगावला आहे. याशिवाय केएल राहुलची पाठराखण केली आहे.

जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार नसता तर त्याच्याबाबतीतही असा विचार केला गेला असता. त्यामुळं हा मुद्दा रोहित किंवा राहुलचा नाही, तर भारतीय संघाच्या कामगिरीचा आहे, त्यामुळं त्याला खेळाच्याच दृष्टीकोनातून पाहायला हवं, असंही गंभीर म्हणाला.

WhatsApp channel