पाहा कोणाच्या बर्थडेला पोहोचला धोनी, ‘या’ फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
धोनीचा (ms dhoni) टेनिस पार्टनर सुमित कुमार बजाजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो टेनिस प्रशिक्षक सुरेंदर काका यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत.
महेंद्रसिंग धोनीने (ms dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकून दोन वर्षे झाली आहेत. पण आजही त्याची फॅन फॉलोइंग किंचितही कमी झालेली नाही. धोनी हा अतिशय साधेपणाने राहतो. तसेच, ग्लॅमरच्या दुनियेपासून कोसो दूर असतो. तर फावल्या वेळेत त्याला त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते.
ट्रेंडिंग न्यूज
धोनी स्वतः सोशल मीडियावरही जास्त सक्रिय नसतो. पण तरी त्याचे नवनवीन फोटो हे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. असेच काही फोटो मंगळवारपासून प्रचंड व्हायरल होत आहेत. हे एका वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आहेत, ज्यात धोनी सहभागी झाला होता.
धोनीला टेनिसचीही खूप आवड आहे. धोनीचा टेनिस पार्टनर सुमित कुमार बजाजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो टेनिस प्रशिक्षक सुरेंदर काका यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत.
धोनीने या वाढदिवसाला खास उपस्थिती लावली होती. त्यामुळे हे बर्थडे सेलिब्रेशन आणखी खास झाले. या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान धोनीने एका मुलीला आपल्या मांडीवर घेतल्याचे फोटोत दिसत आहे. तसेच, धोनी त्या लहान मुलीला केकही खाऊ घालताना फोटोत दिसत आहे. धोनीचे या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहते धोनीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर, तो सलग तीन आयपीएल सीझन खेळला आहे, त्यापैकी त्याने एकदा संघाला चॅम्पियन बनवले आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार आहे.
संबंधित बातम्या