मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA World Cup मध्ये रोनाल्डोचा भीम पराक्रम, मेस्सी-मॅराडोनालाही ‘हा’ टप्पा गाठता आला नाही

FIFA World Cup मध्ये रोनाल्डोचा भीम पराक्रम, मेस्सी-मॅराडोनालाही ‘हा’ टप्पा गाठता आला नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 25, 2022 11:19 AM IST

Cristiano Ronaldo World Record FIFA World Cup: रोनाल्डोने प्रमुख टूर्नामेंट म्हणजेच फिफा विश्वचषक आणि युरो कपमधील १४ सामन्यांमध्ये १३ गोल केले आहेत. याशिवाय तीन वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये पेनल्टीवर गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Cristiano Ronaldo World Record
Cristiano Ronaldo World Record

पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला आहे. फिफा वर्ल्ड कपच्या ५ पर्वांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. लिओनेल मेस्सी, मॅराडोना, पेले यांसारख्या दिग्गजांनाही हा विक्रम अजून साधता आलेला नाही. रोनाल्डोने यापूर्वी २००६, २०१०, २०१४, २०१८ फिफा वर्ल्ड कपमध्येदेखील गोल केले आहेत.

रोनाल्डोचा फिफा विश्वचषकातील हा एकूण १८वा सामना होता. त्याने वर्ल्डकपमधील १८ सामन्यात आतपर्यंत ८ गोल केले आहेत. रोनाल्डोने प्रमुख टूर्नामेंट म्हणजेच फिफा विश्वचषक आणि युरो कपमधील १४ सामन्यांमध्ये १३ गोल केले आहेत. याशिवाय तीन वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये पेनल्टीवर गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

खरं तर, सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला घानाच्या सलिसूने रोनाल्डोला खाली पाडले. त्यामुळे रेफ्रिंनी फाऊल घोषित करुन पोर्तुगालला पेनल्टी देऊ केली. या पेनल्टीवर रोनाल्डोने गोल करत इतिहास रचला. हा त्याचा ११८ वा आंतरराष्ट्रीय गोल होता. आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने रोमहर्षक सामन्यात घानाचा ३-२ असा पराभव केला. सामन्यातील पाचही गोल शेवटच्या २५ मिनिटांत झाले. पोर्तुगालसाठी रोनाल्डोने ६५व्या मिनिटाला, जोआओ फेलिक्सने ७८व्या मिनिटाला आणि राफेल लियाओने ८०व्या मिनिटाला गोल केले. त्याचवेळी घानासाठी आंद्रे औने ७३व्या मिनिटाला आणि उस्माने बुकारीने ८९व्या मिनिटाला गोल केला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या