मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Viral Video: तरुणीने सर्वांसमोर विराट कोहलीला केले किस? व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Virat Kohli Viral Video: तरुणीने सर्वांसमोर विराट कोहलीला केले किस? व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2023 06:31 PM IST

Female Fan Kisses Virat kohli: तरुणी विराट कोहलीला किस करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Virat Kohli
Virat Kohli

Virat kohli: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर चौथी कसोटी ९ मार्चपासून अहमदाबाद येथे होणार आहे. या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, त्याचे योगदान उपयुक्त ठरले. सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणीला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओमागचे सत्य समोर आले आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तरुणी विराटला किस करताना दिसत आहे. मात्र, या तरुणीने मादाम तुसाद संग्रहालयात बसवण्यात आलेल्या विराट कोहलीच्या पुतळ्याला किस केले आहे. ही तरुणी विराट कोहलीची मोठी चाहती आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव केला जात आहे. या तरुणीच्या कृती पाहून काहीजणांनी नाराजीही व्यक्त केली जाते.

विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. तेव्हापासून विराटचे चाहते क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या १२, ४४ आणि २० धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत १०६ कसोटी सामन्याच्या १८० डावात ८ हजार १९५ धावा केल्या आहेत. ज्यात २७ शतक आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.

शेवटच्या दोन कसोटी सामने आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. फक्त केएल राहुलच्या नावासमोर उपकर्णधार असे लिहले जाणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारतीय कसोटी संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

WhatsApp channel

विभाग