मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ronaldo fined: रोनाल्डोला एफए टुर्नामेंटचा दणका, ४९ लाखांच्या दंडासह दोन सामन्यांची बंदी

Ronaldo fined: रोनाल्डोला एफए टुर्नामेंटचा दणका, ४९ लाखांच्या दंडासह दोन सामन्यांची बंदी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 24, 2022 10:39 AM IST

Ronaldo fined: रोनाल्डोने रागाच्या भरात चाहत्याचा मोबाईल फोडला होता. याप्रकरणी आता रोनाल्डोवर कारवाई करताना दंड आणि बंदी घातली आहे.

रोनाल्डोला एफए टुर्नामेंटचा दणका, 49 लाखांच्या दंडासह दोन सामन्यावर बंदी
रोनाल्डोला एफए टुर्नामेंटचा दणका, 49 लाखांच्या दंडासह दोन सामन्यावर बंदी (REUTERS)

Ronaldo fined: कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, आता ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा दणका बसलाय. इंग्लंडच्या एफए कपकडून रोनाल्डोला दंड करण्यात आला असून दोन सामन्यांसाठी बंदीही घालण्यात आली आहे.

रोनाल्डो इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो. काही महिन्यापूर्वी एका सामन्यात पराभवानंतर तो चाहत्यावर संतापला होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात चाहत्याचा मोबाईल फोडला होता. याप्रकरणी आता रोनाल्डोवर कारवाई करताना दंड आणि बंदी घातली आहे.

द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, रोनाल्डोवर ५० हजार पाउंड म्हणजे भारतीय चलनानुसार ४९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच एफए कपने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावरील या बंदीचा काही परिणाम होणार नाही. ही बंदी केवळ एफए स्पर्धेतील सामन्यावेळीच लागू राहील.

एप्रिल महिन्यात मँचेस्टर युनायटेड संघाने एवरटनविरुद्ध सामना खेळला होता. चॅम्पियन्स लीगमध्ये पात्र ठरण्यासाठी हा सामना मँचेस्टर युनायटेडसाठी महत्त्वाचा होता. मात्र त्यांना विजय मिळवता आला नव्हता. या सामन्यात एवरटनने मँचेस्टरला धूळ चारली होती. यामुळे चॅम्पियन्स लीगमध्ये पात्र होण्याच्या मँचेस्टर युनायटेडच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

WhatsApp channel