मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG Cricket Final: अरे देवा! कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळतीये फायनल मॅच

CWG Cricket Final: अरे देवा! कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळतीये फायनल मॅच

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 07, 2022 11:04 PM IST

Tahlia McGrath corona: हा सामना जिंकणारा संघ सुवर्णपदकावर कब्जा करेल. त्याचबरोबर पराभूत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव केला. रविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला.

Tahlia McGrath
Tahlia McGrath

महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचा सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ताहिला मॅग्रा हिचाही संघात समावेश केला आहे. सामन्यापूर्वी ताहिलाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. असे असतानाही तिला खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्वीटरवरही ताहिला कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. असे असतानाही तिला खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, आरोग्य तज्ञ, संघ आणि सामना अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर तिला फायनल सामन्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॅकग्रा मॅचदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये अलगीकरणात बसलेली दिसत आहे, पण ती फलंदाजीसाठी मास्कशिवाय मैदानात आली होती. यादरम्यान ती सहकारी खेळाडूंशी बोलतानाही दिसली. मॅकग्रा या सामन्यात ४ चेंडूत २ धावा करून बाद झाली. दीप्ती शर्माच्या चेंडूवर राधा यादवने शानदार डाइव्ह मारत तिचा झेल पकडला.

मात्र, आता प्रश्न असा उपस्थित होत आहे, की ताहिला जर कोविड पॉझिटिव्ह असेल तर मग इतर खेळाडूंना धोक्यात का टाकले गेले? सामन्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर त्याला जबाबदार कोण? सध्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजकांकडून याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

हा सामना जिंकणारा संघ सुवर्णपदकावर कब्जा करेल. त्याचबरोबर पराभूत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव केला. रविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला.

WhatsApp channel