मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind Vs Aus Test : चौथ्या कसोटीत मोडला जाऊ शकतो ऑस्ट्रेलियाचा 'हा' मोठा विक्रम, भारताला ऐतिहासिक संधी

Ind Vs Aus Test : चौथ्या कसोटीत मोडला जाऊ शकतो ऑस्ट्रेलियाचा 'हा' मोठा विक्रम, भारताला ऐतिहासिक संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 07, 2023 11:08 AM IST

India Vs Australia in border gavaskar trophy 2023 : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारताला एक अनोखा जागतिक विक्रम नोंदवण्याची संधी आहे.

Narendra Modi Stadium
Narendra Modi Stadium

border gavaskar trophy 2023 : भारत व ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुरुवार, ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात एक अनोखा जागतिक विक्रम करण्याची संधी भारताला आहे. अर्थात, हा विक्रम क्रिकेटमधील धावा, विकेटच्या आकडेवारीशी संबंधित नाही. तर, प्रेक्षक संख्येशी संबंधित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कसोटी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एका दिवशी सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. तिथल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजीवर हा विक्रम झाला होता. या मैदानावर २०१३-१४ साली अ‍ॅशेस मालिकेच्या वेळी कसोटी क्रिकेटचा एक सामना पाहण्यासाठी एका दिवशी तब्बल ९१,११२ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. हा आतापर्यंत सर्वात मोठा विक्रम आहे. येत्या गुरुवारी हा विक्रम मोडला जाऊ शकतो.

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख प्रेक्षक येऊ शकतात असा अंदाज आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ८५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. स्टेडियममध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थान मिळाल्यास हा आकडा एक लाखाच्या आसपास जाईल. तसं झाल्यास एकाच वेळी एक लाख लोकांनी कसोटी सामना पाहिल्याचा जागतिक विक्रम होणार आहे.

बॉर्डर-गावसकर मालिकेतील अंतिम सामन्याला पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं देखील हा सामना महत्त्वाच आहे. इंदूरमध्ये तिसरा सामना जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ चौथा सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. त्यामुळं हा सामना चुरशीचा होणार आहे.

पंतप्रधान अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसोटीपूर्वी काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. त्यांच्या हस्ते खेळाडूंना कॅप्स दिल्या जाणार आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झालेल्या गुजरातमधील अहमदाबादमधील या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख ३२ हजार इतकी आहे. इथं एक लाख १० हजार प्रेक्षक एकत्र बसू शकतात.

WhatsApp channel