मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asif Ali - Fareed Ahmad: पाक-अफगाण खेळाडूमंध्ये जोरदार राडा, आसिफ अलीने मारण्यासाठी उगारली बॅट

Asif Ali - Fareed Ahmad: पाक-अफगाण खेळाडूमंध्ये जोरदार राडा, आसिफ अलीने मारण्यासाठी उगारली बॅट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 08, 2022 10:52 AM IST

pakistan vs afghanistan Asif Ali and Fareed Ahmad fight: आशिया चषकात बुधवारी (७ सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात रोहर्षक सामना झाला. पाकिस्तानच्या नसीम शाहने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारून सामना जिंकवला. या ओव्हरपूर्वी पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीने अफगाण गोलंदाजा फरीद अहमदला मारण्यासाठी बॅट उगारली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Asif Ali - Fareed Ahmad
Asif Ali - Fareed Ahmad

आशिया चषकातील सुपर-४ मध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. हा सामना बुधवारी (७ सप्टेंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१२९ धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला कडवी झुंज दिली, पण अखेरीस सामना बाबर आझमच्या संघाने जिंकला. अखेरच्या दोन षटकांत सामना खूप रोमहर्षक स्थितीत पोहोचला होता. त्यामुळे शेवटी सामन्यादरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाचीही पाहायला मिळाली.

शेवटच्या दोन षटके प्रचंड तणावाची

वास्तविक, १८ षटकापर्यंत पाकिस्तानने ७ विकेट गमावल्या होत्या. त्यांना विजयासाठी दोन षटकांत २१ धावांची गरज होती. पाकिस्तानची शेवटची आशा म्हणून आसिफ अली क्रीजवर उपस्थित होता. १९ व्या षटकासह आलेल्या फरीद अहमदने दुसऱ्याच चेंडूवर हरिस रौफला बाद करून पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. असिफ अजूनही क्रीजवर होता, षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने लाँग ऑन आणि मिड-विकेटच्या मध्ये षटकार मारून पाकिस्तानच्या विजयाची शक्यता कायम ठेवली.

त्याच्या पुढच चेंडू फरीद अहमदने स्लो बाउन्सर टाकला. या चेंडूवर आसिफ अलीला ताकद लावता आली नााही. त्यामुळे आसीफने हवेत मारेलला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या करीम जनतने झेलला.आसिफ अली बाद झाल्यानंतर फरीदने उत्साहात आसिफसमोर जल्लोष साजरा केला, त्यामुळे आसीफ चांगलाच संतापला. मैदानावर आसिफ अलीने फरीदला दूर ढकलले आणि नंतर त्याच्यावर बॅट उगारली. तेवढ्यात बाकीच्या खेळाडूंसह पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

दरम्यान, या लज्जास्पद प्रकरानंतर असिफ अलीला एका सामन्याची बंदी घालण्यासोबतच त्याला मॅच फीमधून दंडही ठोठावला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मुद्द्यावर आयसीसीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

नसीम शाहच्या दोन षटकारांमुळे पाकिस्तान फायनलमध्ये

शेवटच्या षटकात नसीम शाहने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत ११ धावा करायच्या होत्या. फझल हक फारुकीच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंवर २ षटकार ठोकून नसीमने सामना संपवला. त्याचवेळी अफगाणिस्तानसह भारत आशिया चषकातून बाहेर पडला आहे. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेशी होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या